नागपूर | नागपूर महानगरपालिकेत नगर रचना विभागांतर्गत भौगोलीक माहिती (GIS Platform) प्रणालीच्या माध्यमातून विकास योजना तयार करण्यासाठी भौगोलीक तज्ञ सल्लागार, भौगोलीक सहाय्यक सल्लागार पदांच्या रिक्त जागा भरण्यात (Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023) येणार आहे.
Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023
भौगोलीक माहिती प्रणाली सहाय्यक सल्लागार पदाची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात प्रथमतः 6 महिन्या करिता खालील पात्रता व अटी / शर्तीनुसार नियुक्ती करावयाची असून, संबंधितांनी आपले अर्ज दि. 16 नोव्हेंबर 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत नियमानुसार सादर करावे.
सदर पदांसाठी याअगोदर प्रसिध्द जाहीरातीनुसार दि. 07.11.2023 रोजी नियोजीत मुलाखती आयोजित केल्या होत्या, याद्वारे रद्द करण्यात येत असुन, मुलाखती व इतर बाबतीत सुधारीत वेळापत्रक / आवश्यक सूचना यथावकाश नागपूर मनपाचे (www.nmcnagpur.gov.in) या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याची कृपया सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखतीचे स्थळ – अतिरिक्त आयुक्त (सामान्य), सिव्हील लाईन, मनपा, नागपूर
मुलाखती करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
PDF जाहिरात – NMC Nagpur Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in