Saturday, September 23, 2023
HomeCareerमुंबई महापालिकेत 42 हजार जागा रिक्त | Mumbai Mahanagar Palika Bharti 2023

मुंबई महापालिकेत 42 हजार जागा रिक्त | Mumbai Mahanagar Palika Bharti 2023

मुंबई | मुंबई महापालिकेत सध्या 42 हजार जागा रिक्त (Mumbai Mahanagar Palika Bharti 2023) असल्याची माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र, पालिकेची ही आकडेवारी खोडून काढत 53 हजार जागा रिक्त असल्याचा दावा ‘दि म्युनिसिपल युनियन’ने केला आहे.

Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 – मोठ्या प्रमाणात असलेल्या रिक्त जागांमुळे निवडणूक कामांची जबाबदारी पालिका कर्मचाऱ्यांना देऊ नये. त्यासाठी सेवानिवृत्त झालेल्या आणि इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.

मुंबईतील मुख्यालयाबरोबरच मुंबई महापालिकेचे काम विविध 24 वॉर्डातून चालते. एकूण 1 लाख 40 हजार जागा असून त्यापैकी महापालिकेचा डोलारा सांभाळण्यासाठी सध्या कायमस्वरूपी 98 हजार कर्मचारी असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

■ महापालिकेत 1,100 लिपिक पदाच्या जागा भरण्यासाठी अंतर्गत कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली आहे. लवकरच या पदांवर कर्मचारी नियुक्त
होतील. तर 1700 लिपिक पदाच्या जागा लवकरच बाहेरून भरण्यात येणार असून, त्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

■ मुंबई अग्निशमन दलात 910 अग्निशमन दलाच्या जवानांची भरती होत असून, त्यापैकी 507 जणांचे प्रशिक्षण सुरू आहे. येत्या काही महिन्यांत आणखी सुमारे 450 जवानांची भरती केली जाणार आहे.

■ तर 400 हून अधिक अभियंत्यांचीही भरती केली जाणार असून त्या प्रक्रियेसाठी एका खासगी संस्थेची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular