मुंबई | मुंबई शहर तसेच उपनगरात नोकरीच्या (Mumbai Jobs 2023) अनेक संधी उपलब्ध आहेत. परंतु अनेकांना या नोकऱ्यांविषयी माहिती नसते. हीच बाब ध्यानात घेत शासनाच्या वतीने नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
Mumbai Jobs 2023
यासाठी शासनाच्या माध्यमातून खाजगी कंपन्याच्या नोकर भरतीसाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. सध्या मुंबई उपनगरातील विविध कंपन्यासाठी अशाच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा 19 नोव्हेंबर पर्यंत आयोजित करण्यात येत आहे.
या भरती अंतर्गत CUSTOMER CARE EXE – AIRPORT, TRAINEE ENGG, ADMIN EXE – MALE, SR. PURCHASE ENGG, BACK OFFICE EXE अशी विविध पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, बीई, बीटेक विद्यार्थी पात्र आहेत.
जाहिरात – Mumbai Job Fair 2023
नोंदणी लिंक – https://rojgar.mahaswayam.gov.in/