अग्निशमन दलात 910 रिक्त पदांची भरती; 12 वी उत्तीर्णांना संधी | Fire Department Recruitment

मुंबई | गेल्या काही वर्षांपासून रखडलेली मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया 13 जानेवारीपासून सुरू झाली आहे. 910 अग्निशामक पदांसाठी ही भरती हाेणार आहे. सात वर्षांनंतर ही भरती हाेत असून, मुंबई महापालिका प्रशासनाने त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सरळसेवा (वाॅक इन सिलेक्शन) पद्धतीने हाेणारी ही भरती 4 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

  • पदाचे नाव – गट ड संवर्गातील पदे भरण्याची जाहिरात
  • पदसंख्या – 910 जागा
  • शैक्षणिक पात्रता –12 वी
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 20 वर्षापेक्षा कमी व 27 वर्षापेक्षा जास्त नसावे
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख –13 जानेवारी 2023 ते 4 फेब्रुवारी 2023
  • भरतीचे ठिकाण – लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान), जे. बी. सी. एन. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम), मुंबई – 400103.
  • अधिकृत वेबसाईट – mahafireservice.gov.in
  • PDF जाहिरातshorturl.at/agvAR
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अग्निशामकउमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची कला, विज्ञान, किंवा वाणिज्य शाखेतील इयत्ता 12 वी किमान 50 टक्के गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.माजी सैनिकांसाठी –उपरोक्त अर्हता धारण केलेली असावी.किंवा उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता 10 वी ) उत्तीर्ण असावा व त्याच्याकडे भारतीय सेनेत किमान 15 वर्षे सेवा केल्याबाबत पदवी प्रमाणपत्र असावे.उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत किंवा तत्सम किंवा उच्चतम परिक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय ( उच्चस्तर किंवा निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पदाचे नाववैदयकीय दर्जा
अग्निशामकउमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्टया सदृढ असावा. सर्व प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून मुक्त असावा.उमेदवाराकडे खालील नमूद केलेला किमान शारिरीक दर्जा असणे आवश्यक आहे. उंची – किमान 172 से.मी. (पुरुषांसाठी)उंची – किमान 162 से.मी. ( महिलांसाठी)छाती – 81 से. मी. (साधारण), 86 से.मी. ( फूगवून ) ( महिलांसाठी छातीची अट लागू नाही)वजन किमान 50 कि.ग्रॅ.दृष्टी- चष्मा किंवा तत्सम साधनांशिवाय नेहमीची (सामान्य), वर्णान्धता: आजारापासून मुक्त असावा.
पदाचे नावभरती प्रक्रीया शुल्क 
अग्निशामकखुला / अराखीव प्रवर्ग- रु. 944/-आणि मागासवर्गीय व आदुघ / अनाथ आरक्षण अंतर्गत अर्ज करणारे उमेदवार – रु.590/- इतके भरती प्रक्रीया शुल्क (वस्तू व सेवा कर सहीत) ‘बृहन्मुंबई महानगरपालिका ‘ (Brihanmumbai Municipal Corporation) या नावाने मुंबईत देय असलेला (Payable at Mumbai) डिमांड ड्राफ्ट भरतीच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे.डिमांड ड्राफ्ट नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही व सदर उमेदवारास भरती प्रक्रीयेत समाविष्ट केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.