मुंबई | मुंबई आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेला आजपासून सुरवात झाली आहे. आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी मुंबई आरोग्य विभागातील 2475 रिक्त जागांच्या भरतीची (Mumbai Arogya Vibhag Bharti 2023) जाहिरात प्रकाशित झाली आहे.
Mumbai Arogya Vibhag Bharti 2023 – या भरती अंतर्गत गट ‘क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर गट ‘ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे.
या पदभरतीसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 29 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 वाजलेपासून सुरु होत आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.
PDF जाहिरात – Mumbai Aarogya Vibhag Bharti 2023
सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती या क्लिकवर उपलब्ध – Aarogya Vibhag Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – http://arogya.maharashtra.gov.in

