Saturday, September 23, 2023
HomeCareerपदवीधरांना महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत नोकरीची संधी | MUCBF Recruitment...

पदवीधरांना महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत नोकरीची संधी | MUCBF Recruitment 2023

मुंबई | महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये विविध रिक्त पदांची भरती (MUCBF Recruitment 2023) केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2023 आहे.

या पदभरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी लिपिक, प्रशिक्षणार्थी वरिष्ठ अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यात (MUCBF Recruitment 2023) येणार आहेत. यासाठी पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. तसेच इच्छूक उमेदवाराकडे MS-CIT किंवा समतुल्य कोर्सचे सर्टिफिकेट असावे. त्याचबरोबर मराठी/इंग्रजी/हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.

या पदभरतीसाठी इच्छूक उमेदवाराचे वय प्रशिक्षणार्थी वरिष्ठ अधिकारी – 30 – 40 वर्षे, प्रशिक्षणार्थी लिपिक 22 ते 35 वर्षे या दरम्यान असावे. अर्ज करताना उमेदवारांना परिक्षा शुक्ल ₹ 800/- अधिक 18% जी.एस.टी असे एकूण ₹ 944 रुपये भरावे लागतील.

भरतीची जाहिरात वाचा : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटmucbf.com

उमेदवाराकडे वैध इमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक असावा. जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय असेल. तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर (DND) असल्यास संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पाठवल्या जाणाऱ्या सूचना, संदेश, माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवारांची राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular