Sunday, September 24, 2023
HomeCareerएसटी महामंडळात वर्ग अ, ब व संवर्ग ब मध्ये विविध पदांसाठी मोठी...

एसटी महामंडळात वर्ग अ, ब व संवर्ग ब मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती! MSRTC Recruitment 2023

मुंबई | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये (MSRTC Recruitment 2023) विविध वर्ग अ, ब व संवर्ग ब कनिष्ठ स्तर या संवर्गातील विविध पदांसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती (MSRTC Bharti 2023) प्रक्रिया राबविण्यात येत असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे.

  • वर्ग 1 संवर्गामध्ये यंत्र अभियंता पदांच्या 11 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे.
  • वर्ग 2 संवर्गांमध्ये विभागीय वाहतुक अधिकारी / आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) (वाहतुक ) पदांच्या 8 जागा, उप-यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) (यांत्रिकी) पदांच्या 12 जागा, लेखा अधिकारी / लेखा परिक्षण अधिकारी पदांच्या 2 जागा, भांडार अधिकारी पदांच्या 2 जागा असे वर्ग 2 मधील 24 जागांसाठी पदभरती प्रक्रिया येत आहे.
  • संवर्ग 2 मधील कनिष्ठ स्तर संवर्गांमध्ये विभागीय वाहतुक अधिक्षक / आगार व्यवस्थापक (वाहतुक) पदांच्या 12 जागा, सहाय्यक यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक (यांत्रिक) पदांच्या 9 जागा, सहाय्यक / विभागीय लेखा अधिकारी पदांच्या 2 जागा, तर विभागीय सांख्यिकी अधिकारी पदांच्या 7 जागा अशा 30 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

शैक्षणिक पात्रता – सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता, इतर अटी आणि नियम पदनिहाय वेगवेगळे आहेत. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहीरात पाहा.

PDF जाहिरात – MSRTC Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट https://msrtc.maharashtra.gov.in/

वरीलपैकी कोणत्याही पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांना मराठी बोलता, लिहीता आणि वाचता येणे अनिवार्य आहे. सर्व पदांकरिता उमेदवारांना MSCIT किंवा समकक्ष संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे गरजेचे. या भरतीसाठी आवश्यक सगळी कार्यवाही विहीत कालावधीमध्ये पूर्ण करणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular