Career

कोल्हापूर ST महामंडळात 302 रिक्त जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा, संधी चुकवू नका | MSRTC Kolhapur Recruitment 2024

कोल्हापूर | कोल्हापूर एसटी महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी शिकाऊ उमेदवार पदांची भरती केली जाणार आहे. याबाबतची सविस्तर अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 310 विविध रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 9,594 ते 10,793 रूपये इतके मानधन दिले जाईल.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या लिंकवरून सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 13 जुलै 2024 आहे.

कोल्हापूर परिवहन विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या अधिसूचनेनुसार, आयटीआय ट्रेड झालेल्या उमेदवारांना ही संधी उपलब्ध आहे. यामध्ये मेकॅनिक मोटार व्हेईकल, मेकॅनिक डिझेल, अॅटो इलेक्ट्रिशियन, पेंटर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर, मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर, सांधाता (वेल्डर) अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. ही भरती एक वर्षाच्या कालावधीसाठी केली जाईल.

वरील आय.टी.आय. ट्रेडसाठी शिकाऊ उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in /या संकेतस्थळावर तसेच बीई शैक्षणिक पात्रता धारकांनी https://www.mhrdnats.gov.in या संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवार या पदांसाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या रजिस्ट्रेशनसह शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणासाठी अर्ज करावयाचा विहित नमुना सदर प्रकटनासोबत सलग्न केला आहे. सदर नमुन्यातच उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.

उमेदवारांनी अर्जासोबत भरती प्रक्रिया शुल्क म्हणून खुल्या प्रवर्गासाठी रु.५००/- (जी.एस.टी. १८% सहीत) एकूण रु. ५९०/- व मागासवर्गीय प्रवर्गासाठी रु.२५०/-(जी.एस.टी.१८% सहीत) एकूण रु.२९५/- भरणे गरजेचे आहे. भरती प्रक्रिया शुल्क \”M.S.R.T. Corporation Fund Account\” यांचे नांवे राष्ट्रीयकृत बँकेतून काढलेला डिमांड ड्राफ्ट स्वरुपात अर्जासोबत सादर करणे करावे.

भरतीची जाहिरात – PDFMSRTC Kolhapur Bharti 2024

विभागीय कार्यालय, रा. प. कोल्हापूर येथून अर्ज विक्री केली जाणार नाही याची संबंधीतांनी नोंद घ्यावी.
कर्मचाऱ्यांच्या मुलाचे नाव जिल्हा सेवायोजन कार्यालय किंवा समाज कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे नोंदविलेले असले पाहिजे. ज्यांच्या मुलांचे नाव सदर कार्यालयात नोंदविलेले नसेल, त्यांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. वाणिज्य पदासाठी उमेदवाराचे नाव मा. उप संचालक, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण आणि राज्य प्रशिक्षण सल्लागार, मुंबई यांचेकडे नोंदणीकृत असले पाहिजे.

आवश्यक कागदपत्रे –
1) शाळा सोडलेचा दाखला झेरॉक्स प्रत (साक्षांकित करून)
2) एस.एस.सी. गुणपत्रक व प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत (साक्षांकित करून)
3) आय.टी.आय.गुणपत्रक व प्रमाणपत्र (सर्व सेमिस्टर) झेरॉक्स प्रत (साक्षांकित करुन)
4) राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र (NATIONAL TRADE CERTIFICATE) झेरॉक्स प्रत (साक्षांकित करुन)
5) जातीचा दाखला झेरॉक्स प्रत (साक्षांकित करुन)
6) आधार कार्ड झेरॉक्स प्रत (साक्षांकित करुन)
7) M.S.R.T.CORPORATION FUND ACCOUNT, Payable at Kolhapur चे नांवे असलेला डिमांड ड्राफट (राष्ट्रीयकृत बँकेचा असणे आवश्यक)

Back to top button