महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | MSRLM Sindhudurg Bharti 2023

0
2261

सिंधुदुर्ग | महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (MSRLM Sindhudurg Bharti 2023) केली जाणार आहे. या भरती अंतर्गत IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ CRP पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, तथा जिल्हा अभियान सहसंचालक, उमेद एमएसआरएलएम, सिंधुदुर्ग, 2 रा मजला, जिग्रावियं इमारत, सिंधुदुर्गनगरी, सिंधुदुर्ग

शैक्षणिक पात्रता

IFC ब्लॉक अँकर – बॅचलर ऑफ सायन्स इन अॅग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशरी, फॉरेस्ट्री, व्हेटर्नरी सायन्स, अॅनिमल हस्बंडरी, बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन.

वरिष्ठ CRP – किमान 12वी पास, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास अभियानात कृषी सखी, पशु सखी, उद्योग सखी, वन सखी इ. पदावर किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव, संबंधित तालुक्याचा रहिवासी असावा.

वेतनश्रेणी
IFC ब्लॉक अँकर – 20000/- प्रति माह (निश्चित मासिक प्रवास देयक रु 2500/- इतके राहील व मूल्यमापन अहवालानुसार मासिक मानधन अदा करण्यात येईल)
वरिष्ठ CRP – प्रवास देयकासह दरमहा कमाल मानधन रु.6000/- (निश्चित मासिक प्रवास देयक रु. 1500/- इतके समाविष्ट राहील व मूल्यमापन अहवालानुसार मासिक मानधन अदा करण्यात येईल.

सदर भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे. उमेदवारांनी Hard Copy मध्ये सादर केलेले अर्जच विचारात घेतले जातील. ईमेल किंवा तत्सम द्वारे सादर केलेले Soft Copy मधील अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातMSRLM Sindhudurg Job 2023
अधिकृत वेबसाईटzpsindhudurg.maharashtra.gov.in