मुंबई | महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित, मुंबई अंतर्गत “लिपिक टंकलेखक” पदाच्या रिक्त जागा भरण्यात (MSPC Recruitment 2023) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – मान्यतापात्र विद्यापिठाची पदवी, मराठी टंकलेखन किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे व इंग्रजी टेकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित, नवी मुंबई. हॅण्डलूम हवेली, 1 ला मजला, साईप्रसाद कॉप्लेक्स, सेक्टर -8, प्लॉट नं. 17, सारसोळे बस डेपोजवळ, नेरुळ, (पश्चिम) नवी मुंबई – 400706.
आवश्यक कागदपत्रे – वैयक्तिक महिती ( BIO-DATA), शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, 2 पासपोट साईज आकाराचे फोटो/पॅन कार्ड/आधार कार्ड
PDF जाहिरात – Maharashtra State Powerlooms Corporation Limited Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – www.mspc.org.in
या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणा-या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक याबाबत भ्रमणध्वनी तसेच ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.
मुलाखत, अनुभव इ. वर आधारीत उमेदवारांची नामिकासुची (प्रतिक्षाधीन यादी) तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सुचीमधील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल.