मुंबई | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (MSC Bank Bharti 2023) केली जाणार आहे. ‘संसाधन व्यक्ती – 1 आणि संसाधन व्यक्ती – 2’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता
संसाधन व्यक्ती – 1
व्यवसाय व्यवस्थापन/ग्रामीण व्यवस्थापन किंवा सहकारी व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी.
CAIIB ला प्राधान्य.
संसाधन व्यक्ती – 2
कृषी आणि संलग्न विषयांमध्ये पदवी, लघु पाटबंधारे, जमीन विकास, शेती यांत्रिकीकरण, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, वनीकरण, अन्न प्रक्रिया, जैव-तंत्रज्ञान इ. पदव्युत्तरला प्राधान्य दिले जाईल.
राज्य सरकार/केंद्र सरकारच्या विभागांमध्ये तांत्रिक क्षमतेने काम केलेले अधिकारी, किंवा ICAR/CSIR संस्थांमधील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
PDF जाहिरात – https://shorturl.at/blB25
अधिकृत वेबसाईट – www.mscbank.com
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज मुख्य कार्यालय, एमएससी बँक 9 येथे स्थित, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई 400 001 या पत्त्यावर पाठवावेत.
