मुंबई | महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्नीत विना-अनुदानित खाजगी तंत्रनिकेतने, औषधनिर्माणशास्त्र व शासनमान्य अल्पमुदतीचे अभ्यासक्रम राबविणा-या संस्थामधील अभ्यासक्रमांसाठी शासनातर्फे फी निश्चिती समिती गठित करण्यात आलेली आहे. सदर समितीमध्ये शासनाद्वारे सदस्यांची निवड करून नियुक्ती करावयाची आहे. (MSBTE Mumbai Recruitment 2023)
सदर पदाकरिता आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या इच्छुक उमेदवारांनी विहित केलेल्या नमुन्यातील आपले अर्ज संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडे अथवा director@msbte.com या ईमेलवर दि. ०५/०७/२०२३ रोजी सायं ०५.३० पर्यंत प्राप्त होतील अशा बेताने पाठवावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. (MSBTE Mumbai Recruitment 2023)
शैक्षणिक पात्रता
सदस्य – तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक किंवा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक म्हणून | काम केलेले सेवा निवृत्त अधिकारी OR
दहा वर्षाहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय सनदी लेखापाल संस्थेचा सदस्य असेल. असा नामांकित सनदी लेखापाल OR
दहा वर्षाहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय व्यय व परिव्यय लेखा संस्थेचा सदस्य असलेला असा नामांकित परिव्यय लेखापाल किंवा प्रख्यात अर्थतज्ञ OR
तंत्रशिक्षण क्षेत्रातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र यामधील प्रत्येकी एक नामांकित तज्ञ.
PDF जाहिरात – https://shorturl.at/htuxO
अधिकृत वेबसाईट – msbte.org.in