मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त पदांची भरती (MPSC PSI Bharti 2023) केली जाणार आहेत. या भरती अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक परिक्षा अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
MPSC PSI Bharti 2023 – या भरती अंतर्गत एकूण 615 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेस पात्र असतील.
अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
प्रस्तुत परीक्षा खालील तीन टप्यांमध्ये घेण्यात येईल
(1) पूर्व परीक्षा – 100 गुण
(2) मुख्य परीक्षा – 300 गुण
(3) शारीरिक चाचणी – 100 गुण
PDF जाहिरात – MPSC PSI Examination 2023
ऑनलाईन अर्ज करा – MPSC PSI Application Form 2023
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
