Saturday, September 23, 2023
HomeAgricultureMonsoon Update | येत्या 4 ते 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय...

Monsoon Update | येत्या 4 ते 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होणार, ‘या’ ठिकाणी वादळी पावसाचा इशारा

मुंबई | गेली अनेक दिवस रखडलेल्या मान्सूनने (Monsoon Update) अखेर राज्यभरातील विविध ठिकाणी हजेरी लावल्याने काहीसे आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. अरबी समुद्रातून अनेक दिवस रेंगाळलेल्या मॉन्सूनची वाटचाल सुरू झाल्याने शनिवारी (ता. 24) कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले. पूर्व विदर्भातही मॉन्सूनने प्रगती केली असून कोकणातील अलिबाग पासून सोलापूर, उदगीर आणि नागपूरपर्यंत मॉन्सूनने धाव घेतली आहे.

राज्यात मान्सून सक्रिय झाला असून आज मुंबईत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचवेळी पुणे शहर आणि तेथील रहिवाशांना सावध राहण्याचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे.  पुढील 4-5 दिवस मुसळधार पाऊस (Monsoon Update) होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आज रात्री जोरदार पाऊस होऊन अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यासाठी हवामान विभागाने एलो अलर्ट जारी केला आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात घाट भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. घाटमाथा परिसर आणि प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, घाट भागात 30-35 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. (Monsoon Update)

दरम्यान केरळमध्ये 8 जून रोजी मान्सून दाखल झाल्यांनतर 11 जून रोजी मॉन्सूनने कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हजेरी लावली. परंतु दरम्यानच्या काळातील ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळामुळे तब्बल 13 दिवस मान्सूनची पुढील वाटचाल थांबली होती. शनिवारी (ता. 24) अरबी समुद्रावरून मॉन्सूनने पुढे चाल केली.

शनिवारी (ता. 24) संपूर्ण, कर्नाटक, तेंलंगणा आणि छत्तीसगड, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागासह, विदर्भाचा आणखी काही भाग, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मिर आणि लडाखच्या काही भागात मॉन्सूनने धडक दिली आहे.

मुंबईतही मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईला पहिल्याच पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. (Mumbai Rains) शनिवारी मुंबईत 115.8 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळपासूनच पावसाने मुंबईत हजेरी लावली. मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढच्या 48 तासांत मुंबईत पाऊस आणखी सक्रीय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. त्यामुळे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही समुद्र किनारी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular