मुंबई | पुढील 48 तासात बंगालची दक्षिण खाड़ी, अंदमान – निकोबार द्वीपसमूह आणि काही भागामध्ये दक्षिण-पश्चिम मान्सून पुढे नेण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात देखील वेगाने प्रगती करण्याच्या मार्गावर आहे. यंदा जून महिन्यात चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. (Monsoon Update 2023)
हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळे राज्यात 28 मे ते 1 जून पर्यंत अवकाळी म्हणजेच मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर दिली आहे. हा पाऊस विजेच्या कडकडाटासह पडणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने आपली आणि आपल्या जनावरांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. शेतकरी वर्गाबरोबर इतरांनी देखील बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी. (Monsoon Update 2023)
अंदमान निकोबार बेटावर दाखल झालेला मान्सून 1 जून 2023 पासून केरळात दाखल होणार आहे. त्यानंतर 6 ते 7 दिवसात मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होणार आहे. 8 जूनला महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून 22 जून नंतर संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी बंधूनी 27 ते 30 जून दरम्यान आपली पेरणीची कामे आटोपावीत. तर ज्या शेतकरी बंधू्च्या पेरण्या शिल्लक राहतील त्यांनी 10 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान पेरण्या कराव्यात, असेही पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
देशातील बहुतांश भागात उष्णतेची लाट कमी होईल – Skymate Weather
येत्या काही दिवसांत पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर भागांसह अनेक भागांमध्ये तापमानात घट होण्याची अपेक्षा आहे. शिवाय, यामुळे देशातील बहुतांश भागांतून उष्णतेची लाट कमी होईल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
मुंबई | मोचा चक्रीवादळा पाठोपाठ आणखी एका चक्रीवादळाचं संकट घोंघावत असल्याची माहिती मिळाली आहे. या चक्रीवादळाचं नाव फॅबियन आहे. त्याने दक्षिण हिंदी महासागरात धडक दिली असून हळूहळू ते किनाऱ्याकडे सरकत आहे. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगतच्या राज्यांना आणि ज्या देशांच्या सीमारेषा समुद्रकिनाऱ्या लगत आहेत त्यांनाही हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. (Monsoon Update 2023)
राज्यात दोन महिने ठिकठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान केल्याचे पहायला मिळाले. तर गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या मोठा त्रास लोकांना सहन करावा लागला आहे. त्यामुळे मान्सून कधी दाखल होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. याबाबत हवामान विश्लेषक पंजाबराव डख यांनी त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पावसाळा सुरू होण्यास अवघा १० ते १२ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याचे सांगितले आहे.
डख यांनी सांगितल्याप्रमाणे २१ मे आणि २२ मे २०२३ ला अंदमान बेटावर मान्सूनने प्रगती केली असून २६ आणि २७ मे रोजी मान्सून अधिक सक्रिय होणार आहे. त्यामुळे २२ मे, २३ मे आणि २४ मे रोजी राज्यात ठिकठिकाणी भाग बदलत मान्सून पूर्व पाऊस हजेरी लावणार आहे. तर ३१ मे, १ जून आणि २ जून २०२३ रोजी पावसाळ्या सारखा जोरदार पाऊस होणार आहे.
महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन ८ जून रोजी होणार असल्याचा अंदाजही यावेळी पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. सध्या मान्सून अंदमान निकोबार बेटावर दाखल होत असून यंदाचा मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला अंदाज चुकला आहे.
नैऋत्य मान्सूनचे वेळेआधीच म्हणजे १९ मे रोजी दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात आगमन झाले. यामुळे पुढील ३-४ दिवसांत नैऋत्य मान्सून, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे.