Saturday, September 23, 2023
HomeBlogतुमच्या आधार कार्डचा गैरवापर होतोय? 'असं' चेक करा एका क्लिकवर | How to...

तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होतोय? ‘असं’ चेक करा एका क्लिकवर | How to check Misuse of Aadhaar Card?

आधार कार्ड हे सध्याच्या घडीला सर्वात महत्वाचे सरकारी कागदपत्र मानले जाते. आधार कार्ड शिवाय काहीच करता येत नसल्याचे दिसून येते. आपल्याला आधार कार्डचा अनेक ठिकाणी वापर करावा लागत असल्याने त्याचा गैरवापर (Misuse of Aadhaar Card) होण्याचा धोका देखील वाढलेला आहे. त्यामुळे आपले आधार कार्ड कुठे-कुठे वापरले गेले आहे हे नेहमी तपासणे गरजेचे आहे.

जर तुमच्या परवानगीशिवाय आधार कार्डचा गैरवापर होत आहे असे वाटत असेल तर ते तपासून आपण त्याबद्दलची तक्रार दाखल करू शकता. परंतु आपल्या आधार कार्डचा गैरवापर (Misuse of Aadhaar Card) होतोय हे कसं जाणून घ्यायचं हे बऱ्याचदा आपल्याला माहित नसते. म्हणूनच आम्ही याबद्दलची माहिती तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.. चला तर पाहूया हे जाणून घेण्याची सोपी पध्दत…

आधारचा गैरवापर जाणून घेण्यासाठी खालील पध्दती अवलंबा

  • यूआयडीएआय च्या अधिकृत साइटवर क्लिक करा https://resident.uidai.gov.in/
  • वेबसाइटच्या डाव्या बाजूला ‘माय आधार’ या पर्यायावर जा.
  • यानंतर ‘आधार सर्व्हिसेस’ हा पर्याय शोधा.
  • त्यानंतर ‘आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री’ हा पर्याय निवडा.
  • यानंतर लॉगिन पर्याय निवडा आणि तिथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा भरा.
  • यानंतर ऑथेंटिकेशनसाठी ‘सेंट ओटीपी’ वर क्लिक करा, तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
  • यानंतर, आपल्या आधार कार्डचा कुठे कुठे वापर झाला आहे याची सर्व हिस्ट्री आपल्यासमोर उपलब्ध होईल.
  • उपलब्ध माहिती पैकी तुम्हाला काही ठिकाणी चुकीचा वापर केल्याचे दिसल्यास खालील पध्दतीने तक्रार करा..

जर तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होत असल्याचे तुम्हाला दिसून आले तर त्वरित तक्रार दाखल करा. तक्रार दाखल करण्यासाठी टोल फ्री नंबर 1947 वर कॉल करा किंवा help@uidai.gov.in वर ईमेल करून तक्रार दाखल करा. https://resident.uidai.gov.in/file-complaint लिंकवर देखील ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता.

जर तुम्हाला ही माहिती चांगली आणि महत्त्वाची वाटत असेल तर, तुमच्या संबधित मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular