Sunday, September 24, 2023
HomeCareerशिक्षण फक्त पदवी & पगार तब्बल महिना 2 लाख, परराष्ट्र मंत्रालयातील...

शिक्षण फक्त पदवी & पगार तब्बल महिना 2 लाख, परराष्ट्र मंत्रालयातील ‘या’ नोकरीसाठी तुम्हीही करू शकता अर्ज | Ministry of External Affairs Recruitment 2023

मुंबई | परराष्ट्र मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून अधिसूचनेनुसार पदवी उत्तीर्ण उमेदवारांना तब्बल 2,08,700 रूपये पगार मिळणार आहे. याठिकाणी उप पासपोर्ट अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदाच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

या पदभरतीसाठी उमेदवाराने भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तर निवड झालेल्या उमेदवारांना Level-11 (67700- 208700) इतक्या वेतनश्रेणीनुसार पगार दिला जाईल.

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

PDF जाहिरातMinistry of External Affairs Recruitment
अधिकृत वेबसाईटhttps://www.mea.gov.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular