Friday, June 9, 2023
HomeCareer12 वी उत्तीर्ण उमेदवारांना विमान सेवेत नोकरीची संधी;`या` पदासाठी भरती सुरू |...

12 वी उत्तीर्ण उमेदवारांना विमान सेवेत नोकरीची संधी;`या` पदासाठी भरती सुरू | Job Alert

मुंबई | नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची (Job Alert) चांगली संधी चालून आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात डीजीसीएने केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून यासाठी बारावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. (Ministry of Civil Aviation Recruitment 2023)

या प्रक्रियेबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी 1 जून 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात. `स्टडी कॅफे डॉट इन`ने या विषयी माहिती दिली आहे.

या भरती प्रक्रियेतून 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही नियुक्ती कायमस्वरुपी तत्त्वावर असेल. या रिक्त जागांमध्ये यूआर प्रवर्गासाठी 10, ईडब्लूएस प्रवर्गासाठी एक, ओबीसीसाठी पाच, एससी प्रवर्गासाठी तीन, एसटी प्रवर्गासाठी एक आणि पीडब्लूबीडी प्रवर्गासाठी एका जागेचा समावेश आहे. हे पद जनरल सेंट्रल सर्व्हिस, ग्रुप -A, गॅझेटेड (नॉन- मिनिस्ट्रल) स्वरुपाचे आहे. या पदावर नियुक्त उमेदवारांचे पोस्टींग डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, सफदरजंग एअरपोर्ट, अरविंद मार्ग, नवी दिल्ली येथे असेल.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर या पदासाठी इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा. तसेच त्याला केबिन क्रूसोबत काम करण्याचा दहा वर्षांचा अनुभव असावा. तसेच सद्यःस्थितीत तो केबिन क्रूमध्ये कार्यरत असावा. उमेदवार पदवीधर असल्यास त्यास प्राधान्य देण्यात येईल. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयात मंजूर सुरक्षा आणि आपत्कालीन प्रक्रिया प्रशिक्षक म्हणून किमान एक वर्ष काम केले असल्यास त्यास प्राधान्य दिले जाईल. उमेदवाराचा अनुभव आणि पात्रतेविषयीचा नियम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नियमानुसार शिथिल करण्यात आला आहे.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार,उमेदवारांकडून मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाल्यास केंद्रीय लोकसेवा आयोग मुलाखतीसाठी बोलावल्या जाणाऱ्या पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी शॉर्टलिस्टींगचा निकष स्वीकारेल. त्याचप्रमाणे आणखी काही निकष यासाठी असतील. त्यानुसार, अपेक्षित पात्रता किंवा सर्व दृष्टीकोनातून पात्र असल्यास, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिसूचनेत विहित केलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता आणि जास्त अनुभव असल्यास शॉर्टलिस्टिंगचा पर्याय स्वीकारला जाईल. उमेदवाराने अत्यावश्यक पात्रतेपूर्वी किंवा पात्रता प्राप्त केल्यानंतरच्या व्यावसायिक अनुभवाचा विचार देखील यासाठी केला जाईल. अत्यावश्यक पात्रता किंवा इष्ट पात्रता म्हणून कोणताही अनुभव नसलेल्या प्रकरणांसाठी हा निकष विचारात घेतला जाईल. तसेच भरती परीक्षा घेतली जाईल.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार व्यक्तिमत्त्व चाचणीमध्ये निवडीसाठी किमान पात्रता / उत्तीर्ण गुणांसह एकूण 100 गुण असतील. मुलाखतीमधील योग्यतेचे श्रेणीनिहाय किमान गुण 100 असतील. हे गुण मुलाखतीनंतर होणारी भरती चाचणी आयोजित केली तरी कायम राहतील. यात अनारिक्षत प्रवर्गातील उमेदवारांनी 100 पैकी किमान 50 गुण मिळवणं गरजेचं आहे. ईडब्लूएससाठी 50, ओबीसासाठी 45, एससी,एसटी आणि पीडब्लूबीडी प्रवर्गातील उमेदवारांनी किमान 40 गुण मिळवणं गरजेचं आहे. ज्या प्रकरणांमध्ये निवड भरती चाचणी द्वारे केली जाते आणि त्यानंतर वैयक्तिक मुलाखत घेतली जाते, त्यावेळी उमेदवाराला मुलाखतीच्या टप्प्यात त्यांच्या संबंधित श्रेणीत योग्यतेची किमान पातळी गाठावी लागेल.

वयोमर्यादा उमेदवारांच्या प्रवर्गानुसार वेगवेगेळी असेल. यात अनारक्षित आणि ईडब्लूएस प्रवर्गातील उमेदवारांचे वय 1 जून 2023 रोजी 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. भारत सरकारने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांनुसार नियमितपणे नियुक्त केलेल्या केंद्र सरकार/ केंद्रशासित प्रदेशातील सरकारी नोकरांसाठी पाच वर्षांपर्यंत कमाल वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे. अन्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी लागू असणाऱ्या वयाच्या सवलतींबाबत उमेदवारांनी अधिसूचनेतील संबंधित परिच्छेदांचा संदर्भ घ्यावा.

पगार –

या पदासाठी पे मॅट्रिक्समधील सातव्या सीपीसीनुसार पे मॅट्रिक्सचा स्तर -11 चे मूळ वेतन 67,700 रुपये ते 2,08,700 रुपये अधिक डीए याप्रमाणे असून ते दरमहा नियुक्त झालेल्या उमेदवारांना दिले जाईल.

अर्ज शुल्क

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, अनारक्षित, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज शुल्क भरावे लागेल. अनारक्षित , ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांना अर्ज शुल्कापोटी 25 रुपये भरावे लागतील. उमेदवार हे शुल्क स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत रोखीने किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाची नेट बँकिंग सुविधा वापरून भरू शकतात. त्याचप्रमाणे यासाठी व्हिसा/मास्टर क्रेडिट/डेबिट कार्ड पेमेंट गेटवेचा वापर करून भरू शकतात. एससी,एसटी, पीडब्लूबीडीएस आणि कोणत्याही समुदायातील महिला उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे.

केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. यासाठी त्यांनी यूपीएससी ओआरए वेबसाईटला भेट द्यावी. त्यानंतर ऑनलाइन अर्ज आणि नोंदणी प्रक्रियेविषयीच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. यानंतर स्कॅन केलेली स्वाक्षरी, फोटोग्राफ, सेल्फ अ‍ॅटेस्टेड डॉक्युमेंट अपलोड करावेत. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरावे. तसेच अर्ज करतेवेळी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पदासाठी आवश्यक पात्रता आणि अनुभव दर्शवणारे डॉक्युमेंटस यूपीएससी ओआरए लिंकवर सादर करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया करण्यापूर्वी उमेदवारांनी नागरी विमान वाहतुकीची अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular