Saturday, September 23, 2023
HomeCareerभारतीय विमान सेवेत महिन्याला 9 लाखांच्या पगाराची नोकरी, तुम्हीही करू शकता अर्ज...

भारतीय विमान सेवेत महिन्याला 9 लाखांच्या पगाराची नोकरी, तुम्हीही करू शकता अर्ज | Ministry of Civil Aviation Bharti 2023

मुंबई | नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) भरती (Ministry of Civil Aviation Bharti 2023) मोहीम हाती घेतली आहे. या भरती अंतर्गत ज्या पदांची नियुक्ती केली जाणार आहे त्या पदांसाठी महिन्याचा पगार किमान 2 लाख 82 हजार ते 9 लाख 30 हजार रूपये आहे.

डीजीसीएमध्ये एकूण 62 रिक्त जागांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये उपमुख्य विमान ऑपरेशन निरीक्षक, वरिष्ठ फ्लाईट ऑपरेशन निरीक्षक, फ्लाईट ऑपरेशन निरीक्षक (विमान), फ्लाईट ऑपरेशन निरीक्षक (हेलिकॉप्टर) आदी पदांची भरती करण्यात येणार आहे.

यापैकी, उपमुख्य विमान ऑपरेशन निरीक्षक पदाकरिता महिन्याला नऊ लाखांचा पगार दिला जाणार आहे. तर सर्वाधिक कमी पगार हा फ्लाईट ऑपरेशन निरीक्षक (हेलिकॉप्टर) या पदाकरिता असून तो 2 लाख 82 हजार इतका आहे.

या पदांची भरती प्रक्रिया येत्या 23 ऑगस्टपासून ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरू होणार असून इच्छुकांना अर्ज करता येणार आहेत. याबाबतची सविस्तर माहिती त्यावेळी अपडेट केली जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular