News

शिरोलीत औद्योगिक वसाहतीत महामार्गालगत ट्रक पेटला, गॅस टाकीचाही स्फोट

कोल्हापूर | पुणे बंगलूरु राष्ट्रीय महामार्गालगत शिरोली येथील औद्योगिक वसाहतीत गॅस वितरण कंपनीच्या ट्रक पेटल्याची घटना घडली आहे. ही घटना आज शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.

औद्योगिक वसाहतीतील आयडीबीआय बँकेच्या शेजारी महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट जवळ असलेल्या महाराष्ट्र गॅरेज मध्ये थोरात गॅस वितरण कंपनीमध्ये ही घटना घडली.

या घटनेत ट्रक पेटला असून यावेळी एका गॅस टाकीचाही स्फोट झाला आहे. या स्फोटात ट्रक व गॅरेजमधील साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. अ

ग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. त्यामुळे मोठ्ठा अनर्थ टळला आहे. ही घटना शनिवारी (दि. १४) रोजी दुपारी साडेबारा च्या सुमारास घडली आहे.

Back to top button