IT Job : जगप्रसिध्द कंपनी मायक्रोसॉफ्ट मध्ये फ्रेशर्स उमेदवारांना नोकरीची संधी; भारतातील ऑफिसेससाठी भरती | Microsoft Recruitment

मुंबई | जगप्रसिध्द कंपनी मायक्रोसॉफ्टच्या अझ्युर (Azure) या हार्डवेअर आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने पदभरती जाहीर केली आहे. कंपनीला (Microsoft Recruitment) सध्या सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची गरज आहे. मायक्रोसॉफ्ट अझ्युरचा सध्या मोठा विस्तार होतो आहे. अनेक नवीन फीचर्स त्यात समाविष्ट होत आहेत. सध्या कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसमध्ये कंपनीला सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची आवश्यकता आहे. त्यासाठी उमेदवार अर्ज करू शकतात. ‘कंटेंट डॉट टेकगिग डॉट कॉम’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.

आयटी क्षेत्रात सध्या सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससाठी चांगल्या संधी आहेत. मायक्रोसॉफ्ट अझ्युरने सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच्या पदासाठी भरती सुरू केली आहे. या पदासाठी फ्रेशर्स अर्ज करू शकतात. उमेदवाराला 0-2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवाराला तांत्रिक ज्ञान असलं पाहिजे. अल्गोरिदम डिझाइन, डेटा स्ट्रक्चर आणि कोडिंग हे कम्प्युटर सान्सचं प्राथमिक ज्ञान उमेदवाराकडे असणं गरजेचं आहे.

जबाबदाऱ्या

  • सर्व्हिस डिझाइन, कोडिंग आणि अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी, पुनर्वापर यावर भर देणं.
  • सर्वोत्कृष्ट इंजिनीअरिंग प्रोसेस तयार करण्यासाठी सहभागी होणं
  • इतर विभागांशी चांगला समन्वय साधणं
  • प्रोजेक्ट, सहकारी व क्लायंट यांच्याकडून वेगानं माहिती मिळवणं.

पात्रता

उमेदवाराकडे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रात किमान एक किंवा शक्यतो दोन वर्षांचा अनुभव असला पाहिजे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि डिझायनिंग, अल्गोरिदम्स, डेटाबेस आयडियाज, no-SQL टेक्नॉलॉजीज, मायक्रोसर्व्हिस आर्किटेक्चर या तांत्रिक गोष्टींचं ज्ञान सध्याच्या बिझनेससाठी उमेदवाराकडे आवश्यक असतं. त्याशिवाय कोड लिहिणं, बग फिक्सिंग, डिझायनिग, टेस्टिंग आणि प्रॉब्लेम्स सोडवणं या गोष्टीही उमेदवाराला जमल्या पाहिजेत.

पात्र उमेदवाराकडे सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग किंवा कम्प्युटर सायन्समधली पदवी असावी. उमेदवारानं याआधी क्लाउड बेस्ड अ‍ॅप्सच्या डेव्हलपमेंटवर काम केलेलं असावं. व्हिज्युअल डिझाइन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि प्रोग्रामिंग यासाठी उत्तम कौशल्यं असावीत. कामावर थोडी देखरेख करता यायला हवी. उमेदवाराकडे मॉडर्न React आणि Angular या UX Frameworksची माहिती, HTML5, CSS3, Javascript, JQuery आणि Typescript याचं ज्ञान अत्यावश्यक आहे.

इच्छुक उमेदवार https://careers.microsoft.com या लिंकवर अर्ज करू शकतात. एक्झिक्युटिव्ह ऑफिसमध्ये हाय क्वालिटी सॉफ्टवेअर सोल्युशन्स देण्यासाठी, रिपोर्टिंग अँड डेटा अ‍ॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म्स/ व्हिज्युअलायझेशन डॅशबोर्ड्स यात मदत करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट अझ्युरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर पदासाठी भरती सुरू आहे. इच्छुक व पात्र उमेदवार लगेचच त्यासाठी अर्ज करू शकतात.