Saturday, September 23, 2023
HomeCareerAI मध्ये करिअर करायचं आहे? मग तुमच्यासाठी Microsoft ने सुरू केलाय 'फ्री'...

AI मध्ये करिअर करायचं आहे? मग तुमच्यासाठी Microsoft ने सुरू केलाय ‘फ्री’ कोर्स, जाणून घ्या Microsoft free AI course बद्दल

सध्या जगभरात एआय अर्थात आर्टिफिशिअल इंटिलिजेन्सचा बोलबाला सुरू आहे. AI हेच भविष्य असल्याचे अनेक जाणकार देखील सांगत आहेत, त्यामुळेच वेळीच एआयबाबत आवश्यक ते कोर्स करून त्यात करिअर करणे गरजेचे आहे.

AI मध्ये करिअर करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण खुद्द ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीने एक मोफत (Microsoft free AI course) जनरेटिव्ह एआय कोर्स लाँच केला आहे. ‘लिंक्ड इन’ कंपनीसोबत करार करून हा कोर्स लाँच केला असून हा एक प्रोफेशनल कोर्स, तसेच हा कोर्स पूर्ण केल्यानंतर सर्टिफिकेटही मिळणार आहे.

मायक्रोसॉफ्टच्या कॉर्पोरेट व्हाईस प्रेसिडेंट केट बेहंकेन यांनी लिंक्ड इनवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. जनरेटिव्ह एआयबाबत हा पहिलाच ऑनलाईन लर्निंग कोर्स असणार आहे. 2025 सालापर्यंत या कोर्ससाठी कसलीही फी घेण्यात येणार नाही. (Microsoft free AI course)

या कोर्समध्ये यूजर्सना एआयसंबंधी महत्त्वाच्या गोष्टी शिकवण्यात येतील. याचा फायदा यूजर्सना करिअरमध्ये होणार आहे. हा कोर्स सध्या इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. आणि येत्या काही महिन्यांत लिंक्डइन लर्निंगवर स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच, जर्मन, चायनीज आणि जपानी भाषेत हा कोर्स लाँच केला जाईल. (Microsoft free AI course)

याव्यतिरिक्त, मायक्रोसॉफ्ट लर्न एआय स्किल्स चॅलेंज, मायक्रोसॉफ्ट उत्पादने आणि सेवांसह आवश्यक AI कौशल्ये शिकण्यासाठी एक विनामूल्य तांत्रिक प्रशिक्षण आव्हान, 17 जुलै रोजी सुरू होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular