Microsoft कंपनीत कायमस्वरूपी Work from Home नोकरी; संधी सोडू नका.!

मुंबई | कोरोनाच्या साथीमुळे जगभरात सुरू झालेला वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड गेल्या काही महिन्यांपासून बदलू लागला आहे. मात्र काही आयटी कंपन्या अजूनही वर्क फ्रॉम होमवर (Work from Home) भर देत आहेत. प्रत्येक कंपनीची यामागची पॉलिसी वेगवेगळी असली तरी वर्क फ्रॉम होम ही संकल्पना अजूनही मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. मायक्रोसॉफ्ट (Microsoft) ही टेक विश्वातील मोठी कंपनी देखील भारतात वर्क फ्रॉम होमसाठी काही पदांसाठी भरती हे. कंपनीला भारतात सीनिअर आणि ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर्स हवे आहेत. कंपनीनं सगळ्यांना कायमस्वरूपी घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. ‘कंटेंट डॉट टेकगिग’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मायक्रोसॉफ्टनं सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससाठी पदभरती जाहीर केलीय. इच्छुक उमेदवार त्यासाठी अर्ज करू शकतात. त्याकरिता उमेदवाराकडे क्लाउड बेस्ड उत्पादनं तयार करण्याचा व शिपिंगचा 5 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा लागेल. क्लाउड बेस्ड सोल्युशन्स तयार करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं याचाही 5 वर्षांपेक्षा जास्त अनुभव अपेक्षित आहे. ऑन साइट कस्टमर्सशी डील करता यावं, टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर्स पदवी किंवा इंजिनीअरिंगची पदवी उमेदवाराकडे असावी. अझ्युर क्लाउड आर्किटेक्चर अँड सर्व्हिसेस यामध्ये सखोल ज्ञान किंवा AWS/GCP मध्ये समान अनुभव उमेदवाराकडे असावा लागेल, असं कंपनीनं म्हटलंय. या पदावर काम करणाऱ्या उमेदवारावर क्लाउड प्लॅटफॉर्ममधले सोल्युशन पॅटर्न्स शोधणं, त्यातल्या गॅप्स शोधणं, त्यांच्या मर्यादा ओळखणं, त्यातले अडथळे दूर करणं अशा स्वरूपाच्या जबाबदाऱ्या असतील.

सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर पदासाठीही मायक्रोसॉफ्टनं कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. या पदासाठी उमेदवाराकडे सॉफ्टवेअर क्षेत्रात 8 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा लागेल. क्लाउड बेस्ड सोल्युशन्स तयार करण्यात व अवलंबण्यात 5 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा. उमेदवाराला क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरच्या हायब्रीड आणि नेटिव्ह क्लाउड सोल्युशन्सवर काम करावं लागेल. तसंच क्लाउड प्रॉडक्ट्सचं इंजिनीअरिंग मायक्रोसॉफ्टच्या ISVs किंवा क्लाउड इंजिनिअरींग टीम्ससोबत टेक सोल्युशन्स द्यावी लागतील. या पदावर काम करणाऱ्या उमेदवारावरही ज्युनिअर इंजिनीअरप्रमाणे क्लाउड प्लॅटफॉर्ममधले सोल्युशन पॅटर्न्स शोधणं, त्यातल्या गॅप्स शोधणं, त्यांच्या मर्यादा ओळखणं, त्यातले अडथळे दूर करणं अशा स्वरूपाच्या जबाबदाऱ्या असतील. तसंच या उमेदवाराकडेही अझ्युर क्लाउड आर्किटेक्चर अँड सर्व्हिसेस यामध्ये सखोल ज्ञान किंवा AWS/GCPमध्ये समान अनुभव असावा लागेल.

Microsoft मधील करिअरच्या विविध संधी पाहण्यासाठी खालील लिंकला फॉलो करा.
Microsoft Career

कोरोनानंतर नोकरीच्या संधी हळूहळू उपलब्ध होत आहेत. त्यामुळे आयटीमध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी ठरणार आहे. विशेष म्हणजे सध्या कंपनी कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमची सुविधा देत आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात राहून या पदांसाठी काम करता येणार आहे.