पुणे | पिंपरी चिंचवड परिसरातील विविध रुग्णालये आणि फायर पॉईट येथे वाहन चालक पदांसाठी रिक्त जागांची भरती (MESCO Pune Bharti 2022) केली जाणार आहे. ही पदभरती माजी सैनिक व त्यांचे पाल्य संवर्गातुन करण्यात येणार आहे.
MESCO Pune Bharti 2022 – वाहन चालक पदाच्या एकूण 60 जागांची कंत्राटी पध्दतीने महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळातर्फे भरती केली जाणार आहे. निवड झालेल्यांना आकर्षक मासिक पगार दरमहा रूपये 31,314/- (कपात रु. 3,700/-) दर सहा महिन्याला वाढीव महागाई भत्ता, कामगार कायद्यानुसार ई.पी.एफ., कामगार नुकसान भरपाई कायदा (WCA) व मॅच्युटीचे फायदे मिळतील. आठवडा एक सुट्टी मिळेल. त्याव्यतिरिक्त सुट्टी लागू नसेल.
MESCO Pune Jobs 2023 – वरील रिक्त पदांसाठी काम करण्याची इच्छा असणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी मेस्को क्षेत्रीय कार्यालय पुणे, मस्तानी हॉल शेजारी, युध्द स्मारकासमोर, घोरपडी, पुणे – 411001 या पत्त्यावर उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 1 सप्टेंबर 2023 आहे.
या भरतीकरिता निवड प्रक्रिया फक्त मुलाखती द्वारे होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीकरिता हजर राहावे. वरील पदांकरीता मुलाखत 1 सप्टेंबर 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे. तसेच सदर नेमणुका या फक्त निव्वळ कंत्राटी पध्दतीने असतील याची नोंद घ्यावी.
PDF जाहिरात – MESCO Pune Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – www.mescoltd.co.in