खुशखबर | ग्रामविकास विभागातील 13 हजार 521 पदांची तात्काळ भरती करण्याचे जिल्हा परिषदांना आदेश | Gram Vikas Vibhag Recruitment

मुंबई | स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदांतील रखडलेली पदभरती तत्काळ करावी, अशी सूचना ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली आहे. (Gram Vikas Vibhag Recruitment) या संबंधी उपसचिव विजय चांदेरे यांनी नुकतेच पत्रक प्रसिद्ध केले आहे. जिल्हा परिषद मधील विविध पदांच्या २०१९ पासून रखडलेल्या १३ हजार ५२१ जागांची तत्काळ पदभरती घेण्यात यावी अशी मागणी होती. अखेरीस यासंदर्भात पदभरतीची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेश विजय चांदेकर उपसचिव ग्राम विकास यांनी सर्व जिल्हा परिषदेला दिले आहेत.

जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया मागील चार वर्षांपासून विविध कारणाने रखडल्या आहेत. त्यात राज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार पदांच्या भरतीची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात कोणतीच हालचाल होत नसल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत.  मागील साडेतीन वर्षांत विविध कारणाने जिल्हा परिषदेतील पदभरती वादग्रस्त ठरली आहे. यंदा पदभरतीची घोषणा करतानाच सर्वसाधारण वेळापत्रक घोषित करण्यात आले होते.

मात्र, या वेळापत्रकानुसार कोणतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही. भरतीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांचे वय दिवसेंदिवस वाढत असून, भरती होत नसल्याने तरुणांमध्ये प्रचंड नैराश्य आले आहे. रखडलेली ही भरती तत्काळ करण्यात यावी, अशा मागण्या विद्यार्थी संघटना करत आहे. पदभरतीच्या वाढत्या असंतोषाची दखल ग्रामविकास विभागाच्या आदेशात घेण्यात आली आहे.

ग्रामविकास विभागाची काल बैठक झाली आहे. एक पद एक जिल्हा परिषद असाच फॉर्म भरता येणार आहे. तसेच परीक्षा एकाच दिवशी घ्यायची आहे. त्यामुळं परीक्षा ऑफलाईन होण्याची शक्यता जास्त असून TCS offline किंवा जिल्हा परिषद स्वतः घेतील. परीक्षा नियोजित दिनांक ला व्हाव्यात म्हणून ग्रामविकास विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे.

Previous Post:-

मुंबई | गेली अनेक महिने ग्रामसेवक भरतीची वाट पाहणाऱ्या (Gramsevak Recruitment) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल 10 हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक गावात ग्रामसेवक हा महत्वाची जबाबदारी संभाळत असतो. सरकारी नोकरीसोबतच गावाची सेवा करण्याची संधी या पदावरील व्यक्तीला मिळते.

ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट- ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यात येणार आहे. सदर मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार दि. १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत लागू राहील. त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाचा शासन निर्णय दि. ३० सप्टेंबर, २०२२ नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येणार आहे.

जिल्हा परिषदांतील गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक देण्यात आले आहे.

  • महत्वाच्या तारखा
  • १ ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
  • २२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील.
  • २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ दरम्यान अर्जाची छाननी करण्यात येणार आहे.
  • तर २ ते ५ मार्च २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.
  • ६ ते १३ एप्रिल २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  • १४ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.
  • १ मे ते ३१ मे या कालावधीत अंतिम निकाल आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले जाणार आहेत.

या वेळापत्रकाचे सर्व जिल्हा परिषदांना पालन करावे लागणार आहे. त्याकरिता रिक्त पदे (एकूण रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत), त्यांची आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी हीजिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची असेल.
अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in