राज्यातील 75 हजार पदांच्या महाभरती संदर्भातील नवीन परिपत्रक प्रकाशित; त्वरित जाणून घ्या अपडेट | Maharashtra State Mega Bharati 2023

मुंबई | राज्यातील 75 हजार पदांची नोकर भरती (Mega Bharati 2023) प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. 75,000 पदे भरण्यासंदर्भातील नवीन शासन निर्णय 17 जानेवारी 2023 रोजी प्रकाशित झाला आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती साठी आपण खालील परिपत्रक काळजीपूर्वक वाचावे.

खुशखबर! १५ ऑगस्ट पूर्वी राज्यात होणार तब्ब्ल ७५,००० पदांची भरती | Maharashtra State Mega Bharati 2023

मुंबई | राज्यातील 75 हजार पदांची नोकर भरती (Mega Bharati 2023) प्रक्रिया 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. ज्या जिल्ह्यात टीसीएस आणि आयबीपीएस कंपनींचे सेंटर नाहीत त्याठिकाणी पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअर कॉलेजची मदत घेतली जाणार आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली लवकरच समिती गठीत केली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत ही मेगाभरती पूर्ण होते का, याकडे राज्यभराचे लक्ष लागून राहिले आहे.

देशाच्या स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार नोकर भरती केली जाणार आहे. मात्र याच नोकर भरतीमध्ये अनेक अडथळे निर्माण होताना पाहायला मिळतात. हे अडथळे दूर करण्यासाठी आणि पारदर्शकपणे नोकर भरती राबविण्यासाठी राज्य सरकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार आहे. ऑनलाईन पद्धतीने पहिल्यांदाच एवढी मोठीभरती होत असल्याने संबंधित कंपन्यांकडे सेंटर कमी पडत असल्याने नोकरभरती कशी राबवायची यावर मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. त्यानंतर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात पहिल्यांदाच सर्वात मोठ्या 75 हजार जागांसाठी ही नोकर भरती होणार आहे. त्यामुळे मागच्या काही परीक्षांमध्ये झालेला घोटाळा लक्षात घेता ही परीक्षा सुरळीतपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी संबंधित कंपन्या आणि राज्य सरकार हे अडथळे दूर करुन हे मिशन कसे यशस्वी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

या भरती प्रक्रियेत परीक्षा घेण्यासाठी ज्या टीसीएस आणि आयबीपीएस संस्थेची निवड करण्यात आली आहे, त्या कंपन्यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. या संस्थांशी करार करण्यात आला, त्याचवेळी याचा विचार करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई, पुणे वगळता इतर जिल्ह्यांत ही समस्या उद्भवण्याची शक्यता होती. त्यामुळे तेथे पॉलिटेक्निक कॉलेज आणि इतर कॉलेजांच्या मदतीने व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षा पद्धतीत कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नसल्याचे या अधिकाऱ्याने नमूद केले.