नागपूर | महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर अंतर्गत रिक्त जागांच्या भरतीसाठी (MBDB Nagpur Recruitment 2023) अर्ज मागवण्यात आले आहेत. “समन्वयक – सामायिक सुविधा केंद्र” पदासाठी ही भरती केली जाणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे.
वरील पदासाठी उमेदवाराकडे फॉरेस्ट मॅनेजमेंट विषयाचा पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा असणे गरजेचे आहे. उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नवीन काटोल नाका चौक, गोरेवाडा रोड, नागपूर या पत्त्यावर पाठवावेत. (MBDB Nagpur Recruitment 2023)
निवड झालेल्या उमेदवारांना महिना 50 हजार रूपये वेतन दिले जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 असून उशिरा प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
PDF जाहिरात – MBDB Nagpur Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – MBDB Nagpur