Tuesday, September 26, 2023
HomeEntertainmentनागराज मंजुळे सोबत चित्रपटात काम करण्याची संधी; तुम्हीही देऊ शकता ऑडिशन -...

नागराज मंजुळे सोबत चित्रपटात काम करण्याची संधी; तुम्हीही देऊ शकता ऑडिशन – जाणून घ्या सविस्तर

मुंबई | मराठीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीत नागराज मंजुळे यांचे नाव आवर्जुन घेतले जाते. सामान्य लोकांनाही आपलासे वाटतील असे चित्रपट रुपेरी पडद्यावर घेऊन येणे ही नागराज मंजुळे यांची खासियत आहे. आतापर्यंत त्यांनी ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’ यांसारखे सुपरहिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. सध्या नागराज मंजुळे यांनी भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा केली आहे. याच चित्रपटात तुम्हाला देखील नागराज मंजुळे यांच्यासह काम करण्याची संधी मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी नागराज मंजुळे यांनी भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा केली होती. याच चित्रपटासाठी आता ऑडिशनला सुरूवात झाली आहे. एखाद्या चित्रपटात आपल्याला संधी मिळावी, असे प्रत्येकाला वाटते. जिओ स्टुडिओज आणि आटपाट निर्मित येणाऱ्या खाशाबा चित्रपटासाठी (Nagraj Manjule New Movie Khashaba) ऑडिशन सुरू झाल्या आहेत.

7 ते 25 वर्षे वयोगटासाठी ही ऑडिशन (Audition For Khashaba Movie) असणार आहे. त्यासाठी काही अटी देखील ठेवण्यात आली आहे. मराठी भाषा तसेच माती आणि मॅटवरची कुस्ती येणे आवश्यक आहे. तसेच शरीरयष्टी दाखवणारे तीन फोटो देखील तुम्हाला काढावे लागतील. त्याचबरोबर 30 सेकंदाचा कुस्ती खेळताना व्हिडीओ (Video) आणि 30 सेकंदात स्वतःची थोडक्यात माहिती सांगणारा एखादा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो पाठवावा लागणार आहे. या ऑडिशनसाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 20 जुलै असणार आहे.

नागराज मंजुळेंनी नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘खाशाबा’ चित्रपटाच्या ऑडिशनबद्दलची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी वयोमर्यादा, अटी आणि ऑडिशन कशी द्यायची, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular