अशीच नसते घडत #फुलन कोणत्याही देशांमध्ये… तिचा भवताल एक पोषक वातावरण तयार करून देतो.
कधी जात धर्म विषमता तर कधी शोषक शोषित यांच्यातला संघर्ष, तर कधी पुरुषी उन्मादी वर्चस्ववाद…
तरीहि ती जगत राहते शक्य तेवढ स्वतःला संतुलित करण्याचा प्रयत्न करत राहते..
कोणतीही #ती सृजनात्मकच विचार करते मात्र तिला विध्वंसक परिस्थिती बनवत राहते..
कुणी उत्तम गृहिणी असेल कुणी सुग्रास स्वयंपाक करणारी, कुणी विणकाम.. सुबक रांगोळी, तर कोणी लिलया यंत्र चालवणारी.. तर कोणी सकस लिहिणारी कुणी बिनदिक्कत सत्य बोलणारी..
पण धाडसाने पुढे येणाऱ्या.. सत्य बोलणाऱ्या.. व्यवस्थेला नजर भिडवत प्रश्न विचारणाऱ्या बाया कुठल्याच अटीवर जिंकूच द्यायच्या नाहीत याचा मनुवादी समाजपुरुष जणु चंग बांधत राहतो…!
पूर्वी त्या परसातल्या आडात किंवा विहिरीत पाय घसरून पडायच्या किंवा स्वयंपाक घरातल्या स्टोव्हचा अचानक भडका उडायचा..
आता आडात किंवा विहिरीत त्यांचा पाय घसरत नाही किंवा स्टोव्ह चा भडकाही उडत नाही. आता त्यांच्या विरोधात माथी भडकवली जातात जात धर्म आणि लैंगिक अहमगंडाने..
काहींना नुसत्या बुभुक्षित नजरेनेच ओरबाडून रक्तबंबाळ केलं जातं.. काहींचे खच्चीकरण करण्यासाठीं चक्रव्यूह रचला जातो भ्रमित भवतालाचा.. तर काही अडवल्या नाडवल्या अन् नागवल्या जातात जशा मणिपूर मध्ये…….
आई शप्पथ फुलन देवी अशीच घडत नाही..
#आम्हीसुध्दा_माणूस_आहोत#असह्य#अगतिक
Andhare Sushama – (शिवसेना उपनेत्या)