केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या घटनेशी महावितरणचा संबंध नाही
कोल्हापूर | संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या घटनेशी महावितरणचा कोणताही संबंध नाही, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या नावाने महावितरणकडून वीज जोडणी देण्यात आली आहे.
महावितरणचा हा उच्चदाब ग्राहक आहे. (ग्राहक क्रमांक – २६६५१९०५६९००, मंजूर वीजभार – १८५ KW) नाट्यगृहास वीज पुरवठा करणारी महावितरणची यंत्रणा (CT-PT, रोहित्र व मीटरींग युनिट) ही नाट्यगृहाच्या इमारतीपासून दूर मोकळ्या जागेत सुमारे १०० फूट अंतरावर आहे.
महावितरणची जबाबदारी ही मीटरींग युनिट पर्यंत असते. तेथून पुढे सर्व जबाबदारी ही संबंधित ग्राहकाची असते. तसेच नाट्य गृहातील अंतर्गत वीज वितरण व्यवस्था ही महानगरपालिकेकडून पाहिली जाते. सद्यस्थितीत नाट्यगृहास वीज पुरवठा करणारी महावितरणची सर्व यंत्रणा सुस्थितीत आहे. त्यामुळे संबंधित आगीच्या घटनेशी महावितरणचा कोणताही संबंध नाही, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.