Saturday, September 23, 2023
HomeCareer‘महापारेषण’ जळगाव येथे मोठी भरती; 10 वी+ITI पास उमेदवारांना संधी | MahaTransco...

‘महापारेषण’ जळगाव येथे मोठी भरती; 10 वी+ITI पास उमेदवारांना संधी | MahaTransco Jalgaon Recruitment 2023

जळगाव | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, जळगाव अंतर्गत रिक्त पदांची भरती (MahaTransco Jalgaon Recruitment 2023) केली जाणार आहे. यासंदर्भातील भरतीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

ही पदभरती वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) या पदांसाठी केली जात असून, पदांनुसार इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता : इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण), तसेच मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आय.टी.आय. (वीजतंत्री) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमिस्टरचे एकत्रित गुणपत्रक अपलोड करणे अत्यावश्यक आहे.

वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत (मागासवर्गीय – 05 वर्षे सूट) असून या पदभरतीसाठी कोणतीही अर्ज फी घेतली जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन दिले जाईल.

PDF जाहिरात – MahaTransco Jalgaon Recruitment 2023
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : MahaTransco Jalgaon Recruitment Application

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular