Tuesday, September 26, 2023
HomeCareerखुशखबर.. महापारेषण मध्ये 3129 रिक्त जागांसाठी भरती सुरु! MahaTransco Bharti 2023

खुशखबर.. महापारेषण मध्ये 3129 रिक्त जागांसाठी भरती सुरु! MahaTransco Bharti 2023

मुंबई | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (MahaTransco Bharti 2023) सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 3129 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन आणि काही पदांसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2023 आहे.

या मेगापदभरती अंतर्गत ”कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण) महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम), तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम), सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य), सहायक तंत्रज्ञ (सामान्य), टंकलेखक (मराठी)” ही विविध पदे भरली जाणार आहेत. (MahaTransco Bharti 2023)

कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच, इतर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (MahaTransco Bharti 2023)

ऑफलाईन पध्दतीसाठी उमेदवारांनी आपला अर्ज –
शासकीय मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट नंबर, सी-19, 7 वा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (ई), मुंबई-400051 (कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) या पत्यावर पाठवावा. तर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी खाली लिंक उपलब्ध करून दिली आहे.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/jvwMR
ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/ddSGV
अधिकृत वेबसाईटwww.mahatransco.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular