News

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोण-कोण झालं विजयी? जाणून घ्या एका क्लिकवर | Maharashtra Vidhan Parishad election Result 2024

मुंबई | विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपाचे पाच उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टीळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. (Maharashtra Vidhan Parishad election Result 2024)

आतापर्यंत हाती आलेलेल्या निकालानुसार, पंकजा मुंडे, योगेश टीळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांनी प्रत्येकी 26 मते मिळाली आहे. मतमोजणी अद्याप सुरू असून उमेदवारांच्या मतांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी केवळ 23 मतांची आवश्यकता होती.

अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार विजयी

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोघेही पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी झाले. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांनी विजय मिळवला.

महाआघाडीच्या 3 पैकी 2 उमेदवारांचा विजय निश्चित

महाविकास आघाडी काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी 26 मतं घेत विजय मिळवला. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. मात्र त्यांना विजय मिळवण्यासाठी एक मताची वाट पाहावी लागत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पाठिंबा दिलेले शेकापचे जयंत पाटील मात्र पराभवाच्या छायेत आहेत.

विधान परिषदेचे विजयी उमेदवार  

भाजपचे विजयी उमदेवार

1) योगेश टिळेकर – 26 मते
2) पंकजा मुंडे – 26 मते
3) परिणय फुके- 26 मते
4) अमित गोरखे – 26 मते
5) सदाभाऊ खोत – 24

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार

1) भावना गवळी – 
2) कृपाल तुमाने

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)

1. शिवाजीराव गर्जे
2. राजेश विटेकर

काँग्रेस विजयी उमेदवार

1) प्रज्ञा सातव – 26

  

Back to top button