खुशखबर: महाराष्ट्र वनसेवक भरती 2025: तब्बल 12,991 पदांची मेगाभरती | Maharashtra Van Sevak Bharti 2025
मुंबई | शासनाच्या वनविभागातील नोकऱ्यांची प्रतिक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाअंतर्गत वनसेवक पदाच्या तब्बल 12,991 जागांची मेगाभरती (Maharashtra Van Sevak Bharti 2025) केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. वनविभागाने या भरतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून लवकरच भरतीच्या तारखा जाहीर होतील असे सांगण्यात येत आहे.
वनविभाग भरती मध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य
या भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. नियुक्तीसाठी संबंधित वनविभागातील (डिव्हिजन) रहिवासी उमेदवार पात्र असतील.
वनविभाग भरती पदाची श्रेणी आणि वेतन – Maharashtra Van Sevak Bharti 2025
वनसेवक पद गट-ड श्रेणीत असून सातव्या वेतन आयोगानुसार एस-१ वेतनश्रेणी (₹१५,०००-₹४७,६००) देण्यात येईल. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनाचा लाभ मिळणार आहे.
वनविभाग भरती – शैक्षणिक पात्रता
किमान शैक्षणिक पात्रता 10 वी पास असून कमाल पात्रता 12 वी पास ठेवण्यात आली आहे. अधिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेत समाविष्ट होण्यासाठी हमीपत्र लिहून द्यावे लागेल.
रोजंदारी मजुरांसाठी विशेष लाभ
सध्याचे कार्यरत रोजंदारी मजूर 55 वर्षांपर्यंत वयोमर्यादेत सूट आणि 10% आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. मात्र, त्यासाठी किमान पाच वर्षे प्रतिवर्ष 180 दिवस तुटक स्वरूपात काम केलेले असणे आवश्यक आहे.
पदोन्नतीच्या संधी
वनसेवक पदावर नियुक्त झालेले उमेदवार 25% पदे पदोन्नतीद्वारे वनरक्षक (गट-क) पदासाठी पात्र ठरतील.
ही भरती प्रक्रिया महाराष्ट्रातील स्थानिक उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत घोषणा आणि अटी-शर्तींचे पालन करावे.
महाराष्ट्र शासन वनविभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा – https://mahaforest.gov.in/index.php/Gr/index/