Sunday, September 24, 2023
HomeCareerपवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023 स्वप्रमाणपत्रसाठी मुदतवाढ | Maharashtra Teachers Recruitment 2023

पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023 स्वप्रमाणपत्रसाठी मुदतवाढ | Maharashtra Teachers Recruitment 2023

मुंबई | पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023 स्वप्रमाणपत्र प्रक्रियेसाठी @mahateacherrecruitment.org.in. मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र नोंदणी करणेसाठी दिनांक 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. 


मुंबई | शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. PAVITRA Portal Registration साठी खुले झाले आहे. दिनांक 1 सप्टेंबर 2023 पासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीला प्रारंभ झाला आहे.

जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये 23 हजार तर खासगी अनुदानित शाळांमध्ये आठ ते दहा हजार पदांची भरती होणार आहे. 1 ते 8 सप्टेंबर 2023 पर्यंत उमेदवारांना ‘पवित्र’ पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. (Maharashtra Teachers Recruitment 2023)

Pavitra Portal Link (👈Click Here)

20 सप्टेंबर 2023 नंतर पोर्टलवर रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहिरात येतील. येत्या दोन महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती मागील अनेक वर्षापासून रखडलेली आहे.

सन 2019 साली  करण्यात आलेल्या संच मान्यतेनुसार राज्यात 67 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातील 80 टक्के म्हणजेच सुमारे 55 हजार पदे आगामी शैक्षणिक वर्ष (2023) सुरू होण्यापूर्वी भरण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती.

मागील काही महिन्यापासून शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचे Aadhar Validation (आधार प्रमाणीकरण), संच मान्यता, बिंदू नामावली आदी बाबीवर काम करत असल्याने भरती रखडली होती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत आणि खाजगी अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळात पुढील दोन महिन्यात पहिल्या टप्प्यात तीस हजार शिक्षकांचे भरती Pavitra Portal द्वारे केली जाईल तर दुसऱ्या टप्प्यात 20 ते 25 हजार शिक्षकांची भरती केली जाईल.


वेळापत्रक

  • पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करणे : 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023
  • उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याची सुविधा : 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2023
  • निवड यादी प्रसिद्ध : 10 ऑक्टोबर 2023
  • मुलाखतीशिवाय घेण्यात येणाऱ्या शाळांसाठी कागदपत्र पडताळणी : 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2023
  • पदस्थापनेसाठी समुपदेशन : 21 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2023

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular