शिक्षक भरती जाहिरात प्रकाशित ; अर्ज प्रक्रिया सुरु | जाणून घ्या संपूर्ण माहिती | Maharashtra Teacher Recruitment

मुंबई | महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता ‘शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२२’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तिथी ८ फेब्रुवारी २०२३ आहे.. “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२२” चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ पासून करण्यात येणार आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये सद्यस्थितीत ६७ हजारांवर पदे रिक्त आहेत. त्यातील ३४ हजार पदभरती जूनपूर्वी होणार आहे. तत्पूर्वी, परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ऑनलाइन ‘टेट’ घेतली जाणार आहे. पण, १५ दिवसांपूर्वीच निश्चित झालेले परीक्षेचे वेळापत्रक पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडले आहे. ३१ जानेवारीला वेळापत्रक जाहीर होऊन फेब्रुवारीअखेरीस परीक्षा सुरु होईल.

  • परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज भरताना परिक्षार्थीनी इयत्ता १० वी इयत्ता १२ वी, पदविका, पदवी इ. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेला अद्ययावत रंगीत फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी व स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे आवश्यक आहे.
  • सदर परीक्षेस व पुढील कार्यवाहीसाठी उमेदवारांशी SMS, Email व्दारे संपर्क होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतः चा भ्रमणध्वनी क्रमांक व Email ID अचूक द्यावा.
  • ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परिक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषीत केला जाईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारी रद्द केली जाईल.

उमेदवारांची पात्रता – Educational Criteria For TAIT Exam 2023

१ भारतीय नागरीकत्व
२ वयोमर्यादेबाबत शासन वेळोवेळी शासन निर्णयाव्दारे विहित करील, अशी वयोमर्यादा शिक्षण सेवकांना/शिक्षकांना लागू होईल.
३ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताः शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकिर्ण २०१८/प्र.क्र.३९७ / टीएनटी-१, दि. ०७ फेब्रुवारी २०१९, शासन शुध्दीपत्रक २५ फेब्रुवारी २०१९, १६ मे २०१९, १२ जून २०१९ तसेच शासनाचे वेळोवेळीच्या आदेशानुसार अर्हताप्राप्त उमेदवार सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. प्रस्तुत जाहीरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अनुषंगिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.१०६ / टीएनटी-०१, दि. १०/ ११ / २०२२ अनुसार उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणान्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होणे अनिवार्य राहील. उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिध्द झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.

ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दतः Maha TAIT Application 2022 Process

  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/ या लिंकव्दारे विहित पध्दतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ७.२ परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
    • (अ) पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने त्याचा स्कॅन केलेला नवीनतम पासपोर्ट साईज (४.५ सेमी
      X ३.५ सेमी) फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
      आकारमान 200X300 pixels
      फाईल साईज 20 kb50kb –
    • (ब) स्वाक्षरी उमेदवाराने त्याची पांढऱ्या कागदावर काळया शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.
      आकारमान 140X60 pixels
      फाईल साईज 10kb 20kb
    • (क) डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी (३ सेमी x ३ सेमीपांढऱ्या कागदावर काळया / निळयाशाई मध्ये) स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या अंगठयाची निशाणी वापरावी.
      आकारमान 240X240 pixels in 200 DPI
      फाईल साईज 20 kb 50kb
    • (ड) स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र उमेदवाराने त्याच्या स्व-हस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञापत्र (१० सेमी x ५ सेमी पांढऱ्या कागदावर काळया/निळया शाई मध्ये लिहीलेले) अपलोड करणे आवश्यक आहे.
      आकारमान 800×400 pixels in 200 DPI
      फाईल साईज 50kb-100kb –
    • स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमूना
  • “I,_ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
    सदरचे प्रतिज्ञापत्र उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात इंग्रजीमध्येच लिहून त्याची स्कॅन प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले, दुसऱ्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. ( लिहू न शकणाऱ्या अंध अथवा अल्प दृष्टी उमेदवारांनी टंकलिखित प्रतिज्ञापत्रावर स्वतः च्या डाव्या हाताच्या अंगठयाचा ठसा उमटवून सदरच्या प्रतिज्ञापत्राची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.)

परीक्षा शुल्क : Maha TAIT Exam 2023 Application Fees

१. खुल्या संवर्गातील उमेदवार (अराखीव): रु. ९५०/-
२. मागासवर्गीय / आर्थिक दृष्टया दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग उमेदवार रु. ८५०/-
३. परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे. ४. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
५. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही.


राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती; येत्या 3 महिन्यात होणार भरती | Maharashtra Teacher Recruitment

औरंगाबाद | देशाच्या स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार नोकर भरती केली जाणार असल्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात केली होती. प्रत्यक्षात अजून एकही पद भरण्यात आलं नाही. अशातच आता पुढील 3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस म्हणाले की निवडणूक आहे म्हणून घोषणा करत नाही तर 2012 पासून भरती बंद होती ती आम्ही सुरू केली आहे.

सर्वच जिल्ह्याने वाढीव मागण्या केल्या आहेत. जेवढ्या पूर्ण करता येणे शक्य आहे त्या पूर्ण केल्या जातील आचारसंहिता असल्यामुळे त्याची घोषणा करता येणे शक्य नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजन आयोगाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली आहे. औरंगाबाद मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात नियोजन विभागाची बैठक पार पडली. यावेळी सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी खासदार आमदार उपस्थित होते.

बुधवारी सकाळी दहा वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात झाली. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर तसेच महसूल उपायुक्त पराग सोमण सामान्य प्रशासन उपायुक्त जगदीश मिनियार यासह औरंगाबादचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांची उपस्थिती होती.

बुधवारी साडेचार तास फडणवीस यांनी विभागांचा आढावा घेतला. यामध्ये लोकप्रतिनिधींनी आपल्या जिल्ह्यासाठी वाढीव निधी देण्यात येण्याची मागणी उपमुख्यमंत्राकडे केली तसेच औषधी आरोग्य संदर्भातील विविध प्रश्न यावर चर्चा करत त्यासाठी जास्तीचा निधी देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.