मुंबई | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, आस्थापनेवर राज्यातील विविध ठिकाणी कंत्राटी तत्वावर भरती (Maharashtra State Security Corporation Bharti 2023) केली जाणार आहे. ही पदभरती सेवानिवृत्त सहा. पोलीस आयुक्त (ACP), दर्जाचे अधिकारी यांची सह संचालक (Jt. Director) आणि सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी (SSO) या पदांकरीता केली जाणार आहे.
यासाठी इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर १- १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई- ४००००५.
PDF जाहिरात – MSSC Mumbai Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – mahasecurity.gov.in
वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यांनी यासोबतच्या विहित नमुन्यातील आपला अर्ज महामंडळास खालील पत्यावर प्रत्यक्ष हजर राहून पोस्टाने पाठविण्यात यावा.
उमेदवारांनी सोबतच्या विहित केलेल्या नमुन्यात त्यांचे अर्ज BIO-DATA पोस्टाने किंवा वर नमुद केलेल्या ई-मेल आयडीवर PDF स्वरूपात सादर करावेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक याबाबत भ्रमणध्वनी तसेच ई-मेलव्दारे कळविण्यात येईल. मुलाखत, अनुभव इ. वर आधारित उमेदवारांची नामिकासुची (प्रतिक्षाधीन यादी) तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सुचीमधील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल.