Tuesday, September 26, 2023
HomeCareerमहाराष्ट्र शासनाचे विविध विभाग आणि जिल्हा परिषदांमध्ये 2.44 लाख पदे रिक्त |...

महाराष्ट्र शासनाचे विविध विभाग आणि जिल्हा परिषदांमध्ये 2.44 लाख पदे रिक्त | Maharashtra State Govt. Mega Recruitment

मुंबई | राज्यात सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध विभाग आणि जिल्हा परिषद अंतर्गत 2.44 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याचे माहिती समोर आली आहे. (Maharashtra State Govt. Mega Recruitment)

राज्य शासनाने ही पदे भरल्यास राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रातील सरकारी पदांवरील नोकर भरतीसाठी प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक भूमिका घेऊन तत्काळ ही रिक्त पदे भरावीत अशी मागणी होत आहे.

महाराष्ट्र राज्यातील शासकीय विभाग आणि जिल्हा परिषदेतील 31 डिसेंबर, 2020 पर्यंतची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार एकूण 29 शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद यात मंजूर पदांची संख्या 10 लाख 70 हजार 840 इतकी आहे. यापैकी 8 लाख 26 हजार 435 ही पदे भरलेली आहेत. तर 2 लाख 44 हजार 405 इतकी पदे रिक्त आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागितलेल्या माहितीनंतर महाराष्ट्र शासनाकडून हा तपशील देण्यात आला आहे. तसेच सरकारी सरळसेवा भरतीचे अंदाजित वेळापत्रकही देण्यात आले आहे.

विभागभरतीचा अपेक्षित कालावधी
राज्य उत्पादन शुल्क जुलै 2023 दरम्यान
वनरक्षक भरतीवनविभाग परीक्षा वेळापत्रक लवकरच जाहीर
नगर परिषद भरतीजून – जुलै
तलाठी भरतीजुलै
आरोग्य विभाग ग्रुप C and Dवेळापत्रक लवकरच होणार जाहीर
जिल्हा परिषद आरोग्य विभागजुलै- ऑगस्ट
नगर परिषद मुख्य परीक्षाजुलै- ऑगस्ट
जिल्हा परिषद गट क इतर पदेजुलै- ऑगस्ट

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular