MPSC पास न करताही राज्य सरकार देणार नोकरी? नक्की कोणाला होणार फायदा?

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. आयुष्याची काही वर्ष MPSC पास करून जॉब मिळवण्यासाठी घालतात. असं असलं तरी ठराविक लोकांना यात यश मिळते, तर अनेकांच स्वप्न अपूर्ण राहतं. हीच बाब ध्यानात घेत जे उमेदवार MPSC पास करू शकलेले नाहीत अशांनाही नोकरी देण्याबद्दल राज्यसरकार विचार करत आहे. याबद्दलची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

राज्यातील जे तरुण MPSC परिक्षेची तयारी करून पुर्व परिक्षा पास होतात पण मुख्य परिक्षा पास होऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी जॉबची सुविधा राज्य सरकार करण्याच्या विचारात आहे. पण हे जॉब्स कंत्राटी स्वरूपाचे असणार आहेत अशीही माहिती राज्य सरकार कडून देण्यात आली आहे. अर्थात या सर्व गोष्टींवर राज्य सरकारकडून सध्या फक्त विचार केला जात आहे.

राज्य सरकारकडून जी हजारो पदे कंत्राटी पद्धतीवर भरली जातात, त्याऐवजी सरकारकडून MPSC पूर्व पास करणाऱ्यांना कंत्राटी पदावर संधी देण्याचा विचार सुरू आहे. यामुळे सरकारचाही पैसा वाचेल आणि तरुणांना योग्य मोबदला मिळेल असा अंदाज आहे. सध्या कंत्राट घेणारे ठेकेदार कर्मचाऱ्यांना व्यवस्थित पगार देत नाही त्यामुळे अशा तरुणांना चांगला पगारही मिळेल असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. या पदभरती संबंधीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

कंत्राटी नोकरीचे फायदे

  • कंत्राटी नोकरी तुम्हाला लवचिक वेळापत्रकात काम करण्याची क्षमता देऊ शकते
  • तुम्ही कमी कालावधीत विविध कौशल्ये मिळवू शकता
  • लाभांची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही जास्त पगार मिळवता.
  • कंत्राटी कामामुळे तुम्हाला अनेक उद्योगांमध्ये काम करण्याची संधी मिळते
  • तुम्‍हाला तुमच्‍या करिअरच्‍या आवडीशी जुळणारी नोकरी मिळेपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये काम करू शकता.
  • तुम्हाला लगेच जब मिळण्याची शक्यता असते.

कंत्राटी नोकरीचे तोटे

  • भूमिकेनुसार पदावर नोकरीच्या सुरक्षिततेचा अभाव असू शकतो
  • करार संपल्यानंतर तुम्हाला नवीन नोकरी शोधावी लागेल
  • कायमस्वरूपी भूमिकेच्या तुलनेत तुम्हाला कमी लाभ मिळण्याची शक्यता आहे
  • कायमस्वरूपी नोकरीच्या तुलनेत आरोग्य लाभ तितके चांगले असू शकत नाहीत.
  • कायम कर्मचारी म्हणून तुम्हाला आजारी आणि सुट्टीचे वेतन हक्क मिळणार नाहीत.

वरील सर्व फायदे आणि तोटे हे सर्व कंपन्यांसाठी आणि MPSC साठी लागू होतीलच असं नाही. कंपनीच्या पॉलिसीनुसार हे सर्व फायदे आणि तोटे बदलत असतील. त्यामुळे पुढे राज्य सरकारनं असं काही करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तुम्ही पात्र असाल तर नक्कीच वरील सर्व गोष्टींचा विचार करूनच तुम्ही नोकरी घेणं आवश्यक आहे.