नवीन GR – सार्वजनिक बांधकाम विभागात सरळसेवेने पदभरती | Maharashtra PWD Recruitment 2022

मुंबई | सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत स्थापत्य कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोटयातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणारी पदे वगळून उर्वरित पदे सरळसेवेने भरण्याकरीता राज्यस्तरीय व प्रादेशिक निवड समितीची रचना करण्यात येत आहे. यासंदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरती प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील एकत्रित मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिनांक ०४.५.२०२२ व दिनांक २१.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या आहेत. त्यानुसार तसेच सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी दिलेल्या / देण्यात येणाऱ्या सूचनांनूसारच भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. पदभरती करताना शासनाने विहित केलेली कार्यपध्दती, सेवाप्रवेश नियम, सर्व प्रकारचे आरक्षण, बिंदूनामावली यासंदर्भातील नियम व आदेश विचारात घेऊनच पदे भरण्याची कार्यवाही करण्याची दक्षता घेण्यात यावी. मार्गदर्शक सूचनांमध्ये दिल्याप्रमाणे वेळोवेळी शासनाची पूर्वमान्यता घेणे बंधनकारक राहील.

GR डाउनलोड करा – https://bit.ly/3HBkN