षंढांची फौज झालेली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शरद माधव पोंक्षे या विकृत माथेफिरु वर गुन्हा दाखल करण्याचे धाडस तरी दाखवणार का?
कोणतीही गोष्ट सातत्याने दृकश्राव्य माध्यमातून लोकांसमोर मांडली की, लोकांना तीच मांडणी खरी वाटते. सत्य पायात चप्पल घालेपर्यंत असत्य गावभर बोंबलत हिंडून आलेले असतेय. हे विद्यमान षंढांची फौज झालेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला ठाऊक नाही काय?
२०१४ नंतर नेहरु – गांधी घराण्याला बदनाम करण्यासाठी जे अनेक प्रयत्न केले गेले. त्यापैकीच एक मिथक म्हणजे सातत्याने गांधी कुटुंबांचे आडनाव खान असल्याचे सांगणे. वास्तविक नेहरु किंवा गांधी कुटुंबाचा खान या नावाशी कसपटाचाही संबंध नाही. आजच विकृत शरद माधव पोंक्षे या माथेफिरु जात्यंधाने वायनाडचे खासदार राहुल गांधी यांचे आडनाव खान असल्याचा जाहीर दावा केला आहे. पोंक्षेवर गुन्हा दाखल करण्याचे धाडस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी दाखवणार का?
मुळात नेहरु कुटुंब हे काश्मिरी पंडित. इंदिरा गांधी यांनी फिरोज गांधी यांच्यासोबत विवाह केला. फिरोज गांधी हे फरेदून जहांगीर घांदे (Ghandy) यांचे सुपुत्र. आईचे लग्नाआधीचे नाव रतीमाई कोमीसरीएट. लग्नानंतर त्या रतीमाई फरेदून घांदे (Ghandy) झाल्या.
महात्मा गांधी यांच्या आडनावावरुन प्रेरणा घेऊन घांदे (Ghandy) कुटुंबीयांनी आपले घांदे (Ghandy) हे आडनाव बदलून गांधी (Gandhi) असे केले. मूळच्या पारशी असलेल्या पतीसोबत इंदिरा गांधी यांनी विवाह केल्याने पारशी आजोबाचा नातू हिंदू कसा? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मात्र पारशी धर्माच्या नियमावलीनुसार पारशी धर्म फक्त जन्माने लाभतो. तो इतर धर्मात जन्मलेल्या व्यक्तीस स्विकारता येत नाही.
कोणत्याही मुलाचे आई व वडील दोघेही जन्माने पारशी असतील तरच त्या दाम्पत्याचे मूल जन्माने पारशी होऊ शकते. त्यामुळे इंदिरा गांधी या पारशी होऊ शकल्या नाहीत. शिवाय इंदिरा गांधी यांनी हिंदू धर्मातील विवाहप्रथेनुसार देवा-ब्राह्मणांना साक्षी ठेवून हिंदू विवाह प्रथेप्रमाणे विवाह केला. त्यामुळे इंदिरा गांधी यांची दोन्ही अपत्ये राजीव गांधी व संजय गांधी हे हिंदू काश्मिरी पंडित ठरतात.
भारतीय कायद्यांचा विचार करता, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या निकालानुसार आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाहानंतर देखील अपत्याला आपल्या आईच्या माहेरची जात-धर्म किंवा आडनाव वापरता येते. त्यानुसारही, इंदिरा गांधी यांची दोन्ही अपत्ये राजीव गांधी व संजय गांधी हे हिंदू काश्मिरी पंडित ठरतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंदिरा गांधी यांच्या कनिष्ठ सुनबाई मनेका गांधी या जन्माने शीख आहेत. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर संपत्ती वाटपावरुन मनेका गांधी फिरोज गांधी या पारशी पित्याची व इंदिरा या हिंदू मातेची अपत्ये हिंदू आहेत या आधारावर हिंदू अविभाजित कुटुंब कायद्यानुसार (The Hindu Succession Act / हिंदू वारसाहक्क अधिनियम) संपत्ती वाटप करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. त्यानुसार, इंदिरा गांधी यांची दोन्ही अपत्ये राजीव गांधी व संजय गांधी हे हिंदू काश्मिरी पंडित ठरतात.
राजीव गांधी, संजय गांधी या दोघांनीही आंतरधर्मीय विवाह केले. मात्र दोघांचेही विवाह हिंदू धर्मातील विवाहप्रथेनुसार देवा-ब्राह्मणांना साक्षी ठेवून विवाह केले. इंदिरा गांधी यांच्या दोन्ही सूना सोनिया गांधी व मनेका गांधी यांनी हिंदू कुलाचार पाळले आहेत. राजीव व संजय या हिंदू पित्यांचे दोन्ही मुलगे राहुल गांधी (काँग्रेस) व वरुण गांधी (भाजपा) हे दोघेही हिंदू असून काश्मिरी पंडित आहेत.
हे त्रिकालाबाधित सत्य सर्वांसमोर असताना शरद माधव पोंक्षे सारख्या विकृताच्या गरळ ओकण्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी मूग गिळून गप्प बसणार असतील तर भद्र लोकहो, तुम्ही आयुष्यभर सत्तेच्या परिघाबाहेर ठेवण्याच्या लायकीचे आहात!!
@Tushar Gaikwad
फोटो : शहिद पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विवाह स्वातंत्र्यसैनिक फिरोज गांधी यांच्या समवेत अग्नीला साक्षी ठेवून हिंदू धर्म पध्दतीने झाल्याचा क्षण.
