Tuesday, September 26, 2023
HomeNewsअजित पवार 3 वर्षात 3 वेळा उपमुख्यमंत्री; हे आहेत राष्ट्रवादीचे नवे मंत्री...

अजित पवार 3 वर्षात 3 वेळा उपमुख्यमंत्री; हे आहेत राष्ट्रवादीचे नवे मंत्री | Maharashtra Political Crisis Update

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले असून त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा धक्का बसला आहे. (Maharashtra Political Crisis Update)

अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, संजय बनसोडे, धर्माराव बाबूराव अत्राम यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज होते. आपल्याकडे पक्षाची इतर जबाबदारी दिली जावी अशी त्यांची मागणी होती. त्याच नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला असल्याची चर्चा आहे. 

2 Jul 2023, 14:36 वाजता

Maharashtra Political Crisis Update: छगन भुजबळांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

2 Jul 2023, 14:32 वाजता

Maharashtra Political Crisis Update: अजित पवार सरकारमध्ये सहभागी, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

2 Jul 2023, 14:27 वाजता

Maharashtra Political Crisis Update: अजित पवार राजभवनात दाखल, काही बोलण्यास नकार

राष्ट्रवादीचे नवीन मंत्री
अजित पवार (उपमुख्यमंत्री), छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, संजय बनसोडे, धर्माराव बाबूराव अत्राम

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular