Saturday, September 23, 2023
HomeCareerराज्यात पोलिसांची तब्बल 18 हजार पदे भरली जाणार, 'हा' आहे नवीन...

राज्यात पोलिसांची तब्बल 18 हजार पदे भरली जाणार, ‘हा’ आहे नवीन निर्णय | Maharashtra Police Bharti 2023

मुंबई | राज्यात तब्बल 18 हजार पोलीस पदांची भरती (Maharashtra Police Bharti 2023) केली जाणार आहे. 1960 नंतर प्रथमच पोलिस दलासाठी नवीन आकृतीबंध तयार करून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Maharashtra Police Bharti 2023 – आत्तापर्यंतची ही विक्रमी भरती मानली जात आहे. राज्य सरकारला याहून अधिक पदांची भरती करायची होती. पण राज्यात प्रशिक्षण सुविधा पुरेशी नसल्याने आधी त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली. तसेच राज्यात पोलिसांची कधीही कंत्राटी भरती केली जाणार नाही, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

विधानसभेत सत्ताधारी पक्षाने उपस्थित केलेली अल्पकालीन चर्चा आणि विरोधी पक्षाने नियम 293अंतर्गत केलेल्या चर्चेला देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी पोलिस दलात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेची माहिती दिली.

सध्या मुंबई आणि पुणे पोलिस दलात 10 हजार पदे रिक्त आहेत. त्यामुळे त्यांच्या विनंतीनुसार सुरक्षा महामंडळातील काही पोलिस 11 महिन्यांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कुठलाही बाहेरचा कंत्राटदार नाही. 1960 चा आकृतीबंध आत्तापर्यंत वापरण्यात येत होता.

नवीन आकृतीबंधानुसार आता प्रत्येक पोलिस ठाण्याला किती अधिकारी-कर्मचारी हवेत, याची नवीन मानके राज्य सरकारने मान्य केली आहेत. 1960 च्या लोकसंख्येनुसार नव्हे, तर त्यासाठी सन 2023 ची आकडेवारी विचारात घेण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular