Career

खुशखबर! राज्यात ५० हजार पदे रिक्त, कोणत्या विभागात किती पदांची भरती होणार? जाणून घ्या | Maharashtra Govt. Job 2024

  • गृह (पोलिस) – ७०००
  • शिक्षण (शिक्षक) – १०,०००
  • स्थानिक स्वराज्य संस्था १०,०००
  • एमपीएससी ‘तर्फे भरती – १०,०००
  • पशुसंवर्धन व अन्य विभाग – १३,०००

मुंबई | राज्याच्या शासकीय विभागांमध्ये विशेषतः ४२ विभागांमध्ये सद्यः स्थितीत अडीच लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. शासनाचे कामकाज गतिमान व्हावे, वैयक्तिक लाभार्थीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, या हेतूने दरवर्षी ५० हजार पदांच्या मेगाभरतीचे नियोजन नवीन महायुतीने केले आहे.

प्रत्येक विभागांमधील रिक्त पदे व पहिल्या वर्षी कोणती पदे भरणे जरुरी आहे, याची माहिती संकलित केली जात असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे . त्याअंतर्गत दरवर्षी १० लाख सुशिक्षित तरुण-तरुणींना विविध शासकीय, निमशासकीय खासगी आस्थापनांमध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेता येणार आहे.

या कालावधीत सहा ते १० हजार रुपयांपर्यंत विद्यावेतनही दिले जात आहे. सद्य:स्थितीत प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या सहा लाख अर्जदारांपैकी ७५ टक्के तरूण-तरुणींनी शासकीय विभागांमध्येच प्रशिक्षणाचा पर्याय निवडला आहे.

यातूनच शासकिय विभागांमध्ये रिक्त पदे आवश्यक असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता शासकीय विभागांमधील रिक्तपदे पुढील पाच वर्षात टप्याटप्प्याने भरली जाणार आहेत.

दुसरीकडे पापूर्वी ३० हजार शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन झाले होते, पण त्यातील २१ हजार पदांचीच भरती झाली आहे. अजूनही ९ हजार पदे रिक्त आहेत.

कृषी, सार्वजनिक आरोग्य, पशुसंवर्धन, उद्योग, मराठी राजभाषा विभाग, गृह, शालेय शिक्षण, महसूल, या विभागांमधील पदे देखील पुढच्या पाच वर्षात भरली जाणार आहेत.

कोणत्या विभागात किती पदांची भरती होणार ?

  • गृह (पोलिस) – ७०००
  • शिक्षण (शिक्षक) – १०,०००
  • स्थानिक स्वराज्य संस्था १०,०००
  • एमपीएससी ‘तर्फे भरती – १०,०००
  • पशुसंवर्धन व अन्य विभाग – १३,०००
Back to top button