Sunday, September 24, 2023
HomeCareerवनविभाग भरती परिक्षेच्या अंदाजित तारखा जाहीर.. तयारीला लागा | Maharashtra Forest Department...

वनविभाग भरती परिक्षेच्या अंदाजित तारखा जाहीर.. तयारीला लागा | Maharashtra Forest Department Bharti

मुंबई | महाराष्ट्र राज्य वन विभागाने भरती परीक्षेच्या तात्पुरत्या तारखा प्रकाशित केल्या आहेत. यानुसार वनविभाग परीक्षा 31 जुलै ते 11 ऑगस्ट 2023 दरम्यान घेतली जाईल.

तसेच या भरतीसाठी 120 गुणांची (60 प्रश्न x 2 मार्क्स ) लेखी परीक्षा असणे अपेक्षित आहे.


मुदतवाढ – वनविभागात वनरक्षक, स्टेनो, लेखापाल भरती – 2,412 रिक्त जागा; शुध्दीपत्रक पहा | Maharashtra Forest Department Bharti

मुंबई | महाराष्ट्र राज्य वन विभाग अंतर्गत मेगाभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 10 जून 2023 पासून सूरू झाली असून 3 जुलै 2023 (मुदतवाढ) पर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे. (Maharashtra Forest Department Bharti)

या भरती प्रक्रिये अंतर्गत 2,412 पदांची भरती केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली उपलब्ध करून दिलेली आहे. त्या लिंक वरून आपण थेट अर्ज करू शकता. या भरती अंतर्गत वनरक्षक पदाच्या 2138 जागा, लोकपाल पदाच्या 129 जागा, सर्वेक्षण पदाच्या 86 जागा, लघुलेखक पदाच्या 13+23 जागा, कनिष्ठ अभियंता पदाच्या 8 जागा, सांख्यिकी सहायक पदाच्या 8+5 जागा, अशा एकून 2412 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या भरतीसाठी 120 गुणांची (60 प्रश्न x 2 मार्क्स) लेखी परीक्षा असणे अपेक्षित आहे. (Maharashtra Forest Department Bharti)

उमेदवारांनी अर्ज भरताना आपल्या ब्राऊसरचे व्हर्जन अपडेट करून घ्यावे, Edge Chromium किंवा Mozilla Firefox (आवृत्ती 87 ते 104) किंवा Google Chrome (आवृत्ती 82 ते 105) ब्राउझर वापरावे म्हणजे आपल्याला कोणती तांत्रिक अडचण येणार नाही.

भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन लिंक – MAHAFOREST RECRUITMENT 2023
PDF जाहिरात वनरक्षक पदासाठी – https://Forest Guard/pdf
PDF जाहिरात सर्वेअर पदासाठी – https://shorturl.at/xOZ13
PDF जाहिरात स्टेनो पदासाठी – https://shorturl.at/gyDGM
PDF जाहिरात लेखापाल पदासाठी –https://shorturl.at/afwDN

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

  • उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरें व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस १८ वर्षापेक्षा कमी वयाचा व २५ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा. राखीव प्रवर्गाना वयातील सवलतीची अट लागू.

टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.

शुध्दीपत्रक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular