Maharashtra Forest Bharti: मेगाभरती | राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती; पात्रता फक्त 12वी, संधी चुकवू नका

मुंबई | महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत रिक्त जागांसाठी मोठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वनरक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज सुरू होण्याची संभाव्य तारीख 15 जानेवारी 2023 असून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख जाहिरात प्रसिध्द झाल्यावर जाहीर केली जाईल.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वनरक्षक (Forest Guard) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे पाल्यही पात्र असतील.
  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

पगार

वनरक्षक (Forest Guard) – 20,000 ते 25,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – लवकरच

एकूण जागा – 9640

वनरक्षक पदासाठी आवश्यक कागदपत्रे

  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – क्लिक करा.

भरती संदर्भात महत्वाच्या तारखांचा तपशील

1. सर्व संवर्गाची बिंदुनामावली मंजूर करून घेणे – 26 डिसेंबर 2022
2. भरती प्रक्रियेसाठी कंपनीशी करार करणे – 31 डिसेंबर 2022
3. जाहिरात प्रसिध्द करणे – 15 जानेवारी 2023
4. अर्ज स्वीकारणे – 31 जानेवारी 2023
5. ऑनलाइन परीक्षा घेणे – 1 ते 20 फेब्रुवारी 2023
6. ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करणे – 25 फेब्रुवारी 2023
7. आवश्यक पदांसाठी चाचणी – 5 ते 20 मार्च 2023
8. अंतिम निवड सूची जाहीर करणे – 15 एप्रिलपर्यंत 2023
9. नियुक्ती आदेश निर्गमित करणे – 30 एप्रिलपर्यंत 2023