News

महाराष्ट्राच्या नवीन मंत्रीमंडळाची Exclusive यादी

Maharashtra Cabinet Expansion: भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 मंत्रि‍पदे आली आहेत. शिवसेनेच्या वाटाला एकनाथ शिंदेंसह 12 मंत्रि‍पदे मिळणार आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रीपदे मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. महायुती सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज दुपारी 2 वाजता पार पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात 39 मंत्री शपथ घेणार आहेत.

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रि‍पदासाठी आज सकाळपासून संबंधित पक्षाच्या वरिष्ठांनी फोन केले आणि मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगितले. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणत्या आमदारांना मंत्रि‍पदासाठी फोन करण्यात आला, पाहा संपूर्ण यादी… (Mahayuti Minister List 2024)

भाजपचे हे आमदार होणार मंत्री; वाचा Exclusive यादी

  1. नितेश राणे 
  2. शिवेंद्रराजे भोसले 
  3. चंद्रकांत पाटील 
  4. पंकज भोयर
  5. मंगलप्रभात लोढा 
  6. गिरीश महाजन 
  7. जयकुमार रावल 
  8. पंकजा मुंडे
  9. राधाकृष्ण विखे पाटील
  10. गणेश नाईक 
  11. मेघना बोर्डीकर
  12. अतुल सावे 
  13. जयकुमार गोरे 
  14. माधुरी मिसाळ 
  15. चंद्रशेखर बावनकुळे
  16. संजय सावकारे
  17. अशोक उईके 
  18. आकाश फुंडकर
  19. आशिष शेलार

शिवसेनेचे हे ’11’ आमदार होणार मंत्री; वाचा Exclusive यादी

  1. उदय सामंत
  2. शंभुराजे देसाई
  3. गुलाबराव पाटील
  4. दादा भुसे
  5. संजय राठोड
  6. संजय शिरसाट
  7. भरतशेठ गोगावले
  8. प्रकाश अबिटकर
  9. योगेश कदम, कोकण
  10. आशिष जैस्वाल
  11. प्रताप सरनाईक

अजित पवार गटाचे हे आमदार होणार मंत्री – वाचा Exclusive यादी

  1. आदिती तटकरे 
  2. बाबासाहेब पाटील 
  3. दत्तमामा भरणे 
  4. हसन मुश्रीफ 
  5. नरहरी झिरवाळ
  6. मकरंद पाटील
  7. इंद्रनील नाईक

मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री

मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलीय. त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. 

या जुन्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही

शिवसेना शिंदे गटातून दीपक केसरकर, तानाजी सावंत, आणि अब्दुल सत्तार यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, असे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, भाजपकडूनही काही मंत्र्यांची नावे वगळण्यात आली आहेत.

धनंजय मुंडे यांचा पत्ता कट होणार?

दरम्यान धनंजय मुंडे यांचे नाव मंत्रीमंडळाच्या यादीत अद्याप समोर न आल्याने तर्क-वितर्क लावले जात आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची नुकतीच हत्या करण्यात आली. त्यावरून बीडमध्ये वातावरण तापले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. यामध्ये धनंजय मुंडे यांचे सहकारी वाल्मीक कराड यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

गेल्या सहा दिवसांपासून मस्साजोग ग्रामस्थांचा संताप समोर आला आहे. या गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तर पोलिसांनी आरोपींना अटक करण्याची डेडलाईन उलटून गेल्याचे म्हणत ग्रामस्थांनी सोमवारी मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. छत्रपती संभाजीराजे हे मस्साजोगमध्ये काल दाखल झाले असून त्यांनी याप्रकरणात आरोपींची अटक होईपर्यंत आणि चौकशी होईपर्यंत संबंधित नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याची आग्रही मागणी अजितदादांकडे केली आहे. संभाजीराजे यांचा रोख धनंजय मुंडे यांच्याकडेच असल्याचे बोलले जात असून त्यामुळे संभाव्य मंत्र्यांच्या यादीत मुंडे यांचे नाव समोर आलेले नाही.

Back to top button