मुंबई | महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लि. येथे विविध रिक्त जागांची भरती (MAHAPREIT Recruitment 2023) केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छूकांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2023 आहे.
मुख्य महाव्यवस्थापक (व्यवसाय विकास), वरिष्ठ अभियंता (प्रकल्प) या रिक्त पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तरी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज B- 501, 502, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, ट्रेड सेंटरच्या पुढे, वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-400051 या पत्त्यावर पाठवावेत. (MAHAPREIT Recruitment 2023)
शैक्षणिक पात्रता
मुख्य महाव्यवस्थापक (व्यवसाय विकास) – पदवीधर आणि एमबीए मार्केटिंग आणि फायनान्स.
वरिष्ठ अभियंता (प्रकल्प) – बी.ई. / बी. टेक (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल)

PDF जाहिरात – MAHAPREIT Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – mahapreit.in