अहमदनगर | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, अहमदनगर अंतर्गत (Mahapareshan Bharti 2023) रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून 37 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2023 आहे. (Mahapareshan Bharti 2023)
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 10वी तसेच ITI ही शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावरुन करायचा आहे. यासाठी नोंदणी क्रमांक E05202701589 हा असून अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
PDF जाहिरात – MahaTransco Ahmednagar Recruitment
ऑनलाईन अर्ज करा – नोंदणीसाठी लिंक