अंतिम तारीख – मुंबई येथे वस्तू आणि सेवा कर विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | MahaGST Department Recruitment

मुंबई | वस्तू आणि सेवा कर विभाग, मुंबई (MahaGST Department Recruitment) अंतर्गत “राज्यकर निरीक्षक” पदाच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – राज्यकर निरीक्षक
 • पद संख्या – 07 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा – 65 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याचा पत्ता – आस्थापना अधिकारी, राज्यकर आयुक्त कार्यालय, ए विंग, जूनी इमारत, 6 वा मजला, वस्तू व सेवाकर विभाग, माझगाव, मुंबई
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – mahagst.gov.in
 • PDF जाहिरातhttp://bit.ly/3ZxZfkR
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
राज्यकर निरीक्षकसेवानिवृत्त राज्यकर निरीक्षकांना आवश्यकतेनुसार विधीविषयक, मेळजुळवणी विषयक तसेच इतर अनुषंगिक कामकाजाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा.
 1. सदर अर्जदार सेवानिवृत्त राज्यकर निरीक्षकाविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी चालू अथवा प्रस्तावित नसावी.
 2. अर्जदार मानसिक, शारिरिक व आरोग्यदृष्ट्या सक्षम असावा तसेच करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्ती वयाच्या 65 व्या वर्षापर्यंतच कार्यरत राहू शकतील.
 3. वित्तलब्धी – पात्र निरीक्षकांची नेमणूक करताना त्यांना अशा नियुक्तीच्या वेळी महागाई भत्त्यासह मिळत असलेल्या निवृत्तीवेतनाएवढी रक्कम (अंशराशीकृत निवृत्तीवेतन वगळून) त्यांचे मासिक पारिश्रमिक म्हणून निश्चित करण्यात येईल, आणि एकदा निश्चित करण्यात आलेले पारिश्रमिक त्यांच्या करार पद्धतीने नियुक्तीच्या कालावधीसाठी (जास्तीत जास्त 3 वर्ष) कायम राहील.
 4. राज्यकर आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील विधी शाखा अथवा मासिक विवरणपत्र मेळ जुळवणी शाखा यांपैकी ज्या कार्यालयात काम करण्यास इच्छूक आहेत, त्याचा उल्लेख सोबतच्या अर्जात करण्यात यावा. त्या कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
 5. आवश्यकता भासल्यास उमेदवारांची निवड करण्यासाठी मुलाखत घेतली जाईल.
 6. नामिकासुचीनुसार नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतर त्याच्या कामाबाबत नियंत्रक अधिकारी समाधानी नसेल तर अशा नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्काळ प्रभावाने रद्द करण्याबाबतचे अधिकार राज्यकर सहआयुक्त (मुख्यालय – 2), माझगाव, मुंबई यांना राहतील.
 7. अधिक माहिती करिता कृपया आलेली PDF जाहिरात बघावी.